Mukesh Khanna Slams Ratna Pathak Shah on karwa chauth controvertial remark
Mukesh Khanna Slams Ratna Pathak Shah on karwa chauth controvertial remark Google
मनोरंजन

'तर तुला बायकांनी मारलं असतं...', रत्ना पाठक यांच्यावर भडकले मुकेश खन्ना

प्रणाली मोरे

Mukesh Khanna Slams Ratna Pathak Shah: दिग्गज अभिनेत्री रत्ना पाठक यांनी काही दिवसांपूर्वी करवा चौथ संदर्भात आपलं मतप्रदर्शन करुन वादाला निमंत्रण दिलं होतं. आधुनिक विचारांच्या, शिकल्या-सवरलेल्या महिला करवा चौथचं व्रत करतात त्याचं आपल्याला खूप आश्चर्य वाटतं असं रत्ना पाठक-शहा म्हणाल्या होत्या. कोणीतरी रत्ना पाठक-शहा यांना तु्म्ही करवा चौथचं व्रत करता का? असे विचारले होते. तेव्हा त्यांची उत्स्फुर्त प्रतिक्रिया होती,'मी काय वेडी आहे?' रत्ना पाठक शहा यांच्या त्या प्रतिक्रियेवर आता मुकेश खन्ना यांनी नाराजगी दर्शवत अभिनेत्रीचा समाचारही घेतला आहे.(Mukesh Khanna Slams Ratna Pathak Shah on karwa chauth controvertial remark)

मुकेश खन्ना हे नेहमीच स्पष्ट आणि टोकाचं विधान करण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी आपल्या व्लॉगमध्ये रत्ना पाठक-शहा यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. ते म्हणाले आहेत,''रत्ना असं गैरजबाबदार होऊन कसं बोलू शकते? तिच्या त्या विधानाच्या विरोधात अख्खा भारत उभा राहिला आहे. रत्नाने आपलं पाठक नाव कायम ठेवलं आहे पण तरी अशी बालिश वक्तव्य करते आहे''.

मुकेश खन्ना पुढे म्हणाले आहेत,''तुला काय वाटतं, तू खूप शिकली आहेस. तुला माहित आहे का,मोठ्या घरातल्या सुना-मुली देखील करवा चौथचं व्रत करण्यात अभिमान मानतात. पण तु या सुंदर सणाला अंधविश्वासाचं नाव दिलंस. हे जास्त शिकलेले लोक नंतर कम्युनिस्ट बनतात. तु काय अर्थहीन बोलत आहेस''.

मुकेश खन्ना करवा चौथ संदर्भातील रत्ना पाठक यांच्या मताशी सहमत नसल्याचं त्यांच्या व्लॉगमधून दिसत आहे. त्यांनी अभिनेत्रीला प्रश्न विचारला आहे की, ''तुझ्यावर कोणत्या धर्माचा पगडा आहे का? जो लग्नानंतर तु स्विकारला आहेस. मग कशाला आपल्या आडनावात पाठक नाव लावतेस. पाठकांना का बदनाम करत आहेस. असं कोण बोलतं. तुम्ही लोक मुर्ख आहात,समजुतदारपणाचं एकही लक्षण तुमच्यात नाही. अरे आम्ही अंधविश्वासावर जरी जगत असलो तरी खुश आहोत. तुझं वक्तव्य कोणालाच आवडलेलं नाही. जर हे विधान तु कुठल्या गावात केलं असतंस तर तिथल्या बायकांनी तुला मारलं असतं''.

रत्ना पाठक-शाह यांनी एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की,''आपल्या समाजात अजूनही खूप जुन्या रुढी-परंपरा आहेत. धर्माला आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनवण्यासाठी जबरदस्ती केली जातेय आजही. आपण शिक्षण घेऊनही अंधश्रद्धाळू बनत चाललेलो आहोत. अचानक विचारलं जातं की मी करवा चौथचं व्रत करते की नाही? आजपर्यंत मला हे कुणीच विचारलं नव्हतं. गेल्यावर्षी कुणीतरी विचारलं तेव्हा मी म्हटलं होतं,मी वेडी आहे का?''

आजच्या आधुनिक युगातही शिकलेल्या स्त्रिया करवा चौथचं व्रत करतात ही गोष्ट मला हैराण करुन सोडते. आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करायचं. कारण आपल्या भारतात विधवा म्हणून आयुष्य काढणं खूप वाईट समजलं जातं. मग कुठलीही अशी गोष्ट करत सुटायचं जी मला विधवा बनवण्यापासून वाचवेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

Mumbai News: महाराष्ट्र दिनानिमित्त दादरसह परिसरातील वाहतुकीत बदल, वाचा महत्वाची बातमी 

Viral Video: रायफल्सच्या धाकाने ताब्यात घेत जाळली कार, वाचा न्यायाधीशाच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT