Mumbai based vendor introduces juices named after Pushpa star Allu Arjun sakal
मनोरंजन

Allu Arjun juice: आता प्या अल्लू अर्जुन ज्यूस; मुंबईतील ज्यूसवाल्याचे 'पुष्पा' प्रेम

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा'चं वारं काही लोकांच्या डोक्यातून जाईना..

नीलेश अडसूळ

allu arjun juice: 'पुष्पा' या दाक्षिणात्य चित्रपटाने संपूर्ण देशाला वेड लावले असून 'पुष्पा'स्टार अल्लु अर्जुनच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. अल्लू अर्जुनच्या चाहत्यांमध्ये आपले त्याच्यावरचे प्रेम दाखवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे चढाओढ सुरू असते. यामध्ये भर पडली आहे मुंबईतील प्रसिद्ध बंटी ज्यूस सेंटरची.

(Mumbai based vendor introduces juices named after Pushpa star Allu Arjun)

बंटी ज्यूस सेंटरचा चालक असलेला बंटी, अल्लू अर्जुनाचा खूप मोठा चाहता असून त्याने आपल्या ज्यूस सेंटरमध्ये अल्लू अर्जुनच्या नावाने विविध पेये सादर केली आहेत. अल्लू अर्जुनचे डायलॉग आणि प्रतिमा असलेल्या विशेष ग्लासमध्ये हे ज्यूस सर्व्ह करण्यात येत असून त्यावर ग्राहकांची झुंबड उडत आहेत.

अल्लू अर्जुनवर (allu arjun) असलेले आपले प्रेम अशा प्रकारे दर्शवण्याचे कारण विचारले असता बंटी ज्यूस सेंटरचे बंटी म्हणाले की, "अल्लू अर्जुन सरांच्या पहिल्या चित्रपटापासूनच मी त्यांचा खूप मोठा चाहता आहे. मला त्यांचे सगळे डायलॉग आवडतात पण 'पुष्पा' मधील "फायर है मे.. झुकेगा नाही" हा डायलॉग माझा आवडता आहे.

'पुष्पा' चित्रपट देशभर यशस्वी झाल्यानंतर, अल्लू अर्जुनची लोकप्रियता आणि स्टारडम आकाशाला भिडले आहे. 'पुष्पा'मधील ब्लॉकबस्टर गाणी सामी सामी आणि श्रीवल्ली यांनी नवरात्रीदरम्यान आपले वर्चस्व गाजवले. दिवाळीतही सुपरस्टार अल्लू अर्जुनचा चेहरा असलेले फटाके देशभर विकले गेले. अलीकडेच, पुष्पाच्या दुसर्‍या भागाची घोषणा झाली असून, अल्लू अर्जुनचे चाहते त्याला पुन्हा एकदा 'पुष्पा'च्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रतीक्षा करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

leopard Attack: हृदयद्रावक घटना! चार वर्षांच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू; गोंदियात जीव मुठीत धरून मुले घरातच, सहानंतर सामसूम!

Makar Sankranti 2026: तुळशीशी संबंधित 'या' 3 चुका टाळा, अन्यथा माता लक्ष्मी होईल नाराज

Latest Marathi News Live Update : जालन्यात ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या काळात आधार, पॅन आणि मतदान कार्ड कचऱ्यात

Ladki Bahin Yojana : काँग्रेसच्या पत्रानंतरही मकर संक्रातीला लाडक्या बहीणींना पैसं मिळणार? CM फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देत विषयच मिटवला...!

IND vs NZ, 1st ODI: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताच्या संघात ६ गोलंदाजांची निवड, पाहा प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT