Yogi Adityanath esakal
मनोरंजन

Mumbai Film City: मुंबई फिल्मसिटी उत्तर प्रदेशात जाणार? योगी आदित्यनाथ स्पष्टचं बोलले

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर

रुपेश नामदास

Yogi Adityanath: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबईतल्या उद्योग क्षेत्रातील दिग्गजांची भेट त्यांनी घेतली आहे. सिने जगतातील लोकांचीही भेट घेतली असल्याचे सांगितले जाते, तर नोएडामध्ये उभारल्या जाणाऱ्या फिल्म सिटीबाबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

यासंदर्भात संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली होती. योगी आदित्यनाथ फिल्म इंडस्ट्री घेऊन जाऊ शकत नाही. त्यांना हावं तर त्यांनी सिनेमा वाढवण्यासाठी प्रयत्न करावा यामुळे देशाच्या विकासासाठी मदत होईल. जर ते गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आले असतील तर उद्योगपतींशी बोला.

तुम्ही राज्याचा विकास करण्यासाठी आलेला आहेत. अशी टीका केली होती मात्र. फिल्म इंडस्ट्रीच्या मुद्दावरून योगी आदित्यनाथ यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे. त्यांनी मुंबई फिल्मसिटी उत्तर प्रदेशात जाणार असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

हेही वाचा: ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

ते म्हणाले की, मुंबई ही मुंबईच आहे. ही देशाच्या अर्थव्यवस्थेची भूमी आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. उत्तर प्रदेश देशाची धर्मभूमी आहे. तर उत्तर प्रदेश ही भारताची धार्मिक राजधानी आहे. आम्ही उत्तर प्रदेशमध्ये स्वत:ची फिल्मसिटी उभारणार आहोत, मुंबईमधून फिल्मसिटी नेण्याचा आमचा कोणताही डाव किंवा विचार नाही" असं स्पष्ट मत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मांडलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

heart-stopping footage : Video काळजाचा थरकाप उडवणारा! 'तो' ट्रॅकवर निपचित राहिला पडून अन् वरून धावती रेल्वे

मुलगी झाली हो...! कियारा आणि सिद्धार्थ झाले आई-बाबा, मल्होत्रा कुटुंबात चिमुकल्या पाहुणीचं आगमन!

आता ट्रेनच्या जनरल कोचमध्ये फक्त १५० प्रवाशांना तिकिटे मिळणार! रेल्वे मंत्रालय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Tesla Car Booking Offer: बंपर ऑफर...! आता फक्त २२ हजारांत बुक करता येणार 'टेस्ला'ची अलिशान कार, मात्र...

Sangli Crime : वाढत्या गुन्हेगारीची गृह विभागाकडून दखल; जिल्हा प्रशासन, पोलिसांचे मॅरेथॉन बैठक; अहवाल लवकरच मुख्यमंत्री फडवणीस यांच्याकडे

SCROLL FOR NEXT