Mumbai Diaries Season 2 trailer Out Mohit Raina Konkona Sen Sharma  esakal
मनोरंजन

Mumbai Diaries 2 : २६ नोव्हेंबर रोजी नेमकं काय घडलं होतं? 'मुंबई डायरीज'चा थरकाप उडवून देणारा ट्रेलर!

ओटीटी मनोरंजन विश्वात मुंबई डायरीज नावाच्या मालिकेनं मोठी लोकप्रियता मिळवली होती.

युगंधर ताजणे

Mumbai Diaries Season 2 trailer Out Mohit Raina Konkona Sen Sharma : ओटीटी मनोरंजन विश्वात मुंबई डायरीज नावाच्या मालिकेनं मोठी लोकप्रियता मिळवली होती. आता या मालिकेचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्याचा ट्रेलर सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. वैद्यकीय क्षेत्र आणि त्यातील मनमानीपणा यावर दिग्दर्शकानं लक्ष केंद्रीत केले आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

प्रसिद्ध दिग्दर्शक निखिल अडवाणी यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले आहे. त्या मालिकेच्या पहिल्या सीझनला देखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. दुसऱ्या सीझनमध्ये मुंबईवर झालेला तो हल्ला आणि त्यानंतर ज्या कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांच्यावरील उपचार यातील संघर्ष दिग्दर्शकानं मांडण्याा प्रयत्न केला आहे.

Also Read - Male Andropause: काय सांगता पुरुषांनाही येते रजोनिवृत्ती?

कोंकणा सेननं म्हटले आहे की, मुंबई डायरीजमध्ये काम करणे ही खूपच आनंदाची गोष्ट होती. निखिल अडवाणी सारख्या दिग्दर्शकासोबत काम करणे ही मोठी बाब आहे. तो अनुभव खूपच आनंदाचा होता. सगळ्या कलाकारांनी एकमेकांना सहकार्य करत हा सीझन अधिक दर्जेदार व्हावा यासाठी प्रयत्न केला. नव्या सीझनमध्ये डॉक्टर आणि त्यांचे सहकारी यांच्यातील नाते अधिक प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

मुंबई डायरीजच्या दुसऱ्या सीझनमध्ये श्रेया धन्वंतरी, मृण्मयी देशपांडे, टीना देसाई, प्रकाश बेलावाडी, परमब्रता चट्टोपाध्याय, रिद्धी डोगरा, बालाजी गौरी आणि सोनाली कुलकर्णी यांच्या भूमिका आहेत. या मालिकेचा दुसरा सीझन हा २६ ऑक्टोबर रोजी प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT