मनोरंजन

"पद्मावत' 25 जानेवारीला प्रदर्शित होणार 

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित "पद्मावत' चित्रपटाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून यू/ए प्रमाणपत्र देण्यात आले आहे. 

संजय लीला भन्साळीनिर्मित व दिग्दर्शित या चित्रपटाचे आधीचे नाव "पद्मावती' होते. या चित्रपटाला करणी सेना संघटना, तसेच काही राजकीय पक्षांनी विरोध केल्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाचे नाव बदलण्याची सूचना केली होती. सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या आवश्‍यक बदलानंतर चित्रपटाला यू/ए प्रमाणपत्र दिले जाईल, असेही सांगण्यात आले होते. 

या चित्रपटातील "घुमर...' गाण्यामध्येही बदल करण्याचा; तसेच चित्रपट दाखवण्यापूर्वी सतीच्या प्रथेला पाठिंबा नसल्याबाबतचे सूचनापत्र दाखवण्यात यावे, अशा सूचना या सेन्सॉर बोर्डाने दिल्या होत्या. त्यानंतर भन्साळी यांनी चित्रपटाचे नाव बदलण्याची तयारी दर्शवली होती. या चित्रपटाचे नाव बदलून चित्रपट प्रदर्शनाची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते. सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला यू/ए प्रमाणपत्र दिले असून, तो 25 जानेवारीला प्रदर्शित होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT