Munawar Faruqui esakal
मनोरंजन

Munawar Faruqui: 'कोणं म्हणतं ब्रेक अप झालं? अजुनही तिच्यासोबतच!'

मुनावरचा खास चाहतावर्ग आहे. त्याला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

युगंधर ताजणे

Munawar Faruqui: तुम्हाला मुनावर फारुखी आठवतो का, तोच तो ज्यानं कंगनाच्या लॉक अपच्या पहिल्या सीझनचे विजेतेपद पटकावले होते. आता तो आणि त्याची गर्लफ्रेंड नझिला चर्चेत आले आहे. त्यांचे ब्रेक अप झाल्याच्या बातम्या (Social media viral news) व्हायरल झाल्या होत्या. त्यावर मुनावरनं नाराजी व्यक्त करुन लोकांना काहीही काम नाही. ते वाट्टेल ते बोलत असतात. असे म्हणून संतप्त प्रतिक्रिया दिली होती. आता पुन्हा एकदा मुनावर सोशल मीडियावर सक्रिय झाला (bollywood news) आहे. त्यानं आपण अजुनही नझिलाच्या प्रेमात असून आमच्या प्रेमावर विनाकारण संशय घेण्याचा प्रयत्न नेटकऱ्यांनी करु नये असे म्हटले आहे.

स्टँड अप कॉमेडियन म्हणून मुनावरचे नाव घ्यावे लागेल. सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणारा, आणि आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांमुळे ओळखला (entertainment news) जाणारा मुनावर मोठा सेलिब्रेटी आहे. सोशल मीडियावर कायम वादग्रस्त म्हणून मुनावरची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यालाही आपल्याला वादग्रस्त म्हणून ओळखले जाते असे म्हणून घ्यायला आवडते. काही महिन्यांपूर्वी तो कंगनाच्या लॉक अप नावाच्या रियॅलिटी शोमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी त्यानं केलेले खुलासे चाहत्यांसाठी धक्कादायक होते.

मुनावरचा खास चाहतावर्ग आहे. त्याला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्याचं नाव हे सोशल मीडिया इन्फ्लुंसर नझिलासोबत जोडलं जाऊ लागल्यानंतर वेगळ्याच चर्चेला उधाण आले होते. ते एकमेकांना डेटही करत होते. त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. असे असताना दुसरीकडे त्यांचे ब्रेक अप झाल्याच्या बातम्याही वेगानं समोर आल्या आहेत. यावर मुनावरनं प्रतिक्रिया दिली आहे.

लोकं काहीही बोलतात. (लोग कुछ भी फुक देते है) अशा शब्दांत मुनावरनं प्रतिक्रिया दिली आहे. मुनावर आणि नझिला हे वेगळे झाले, त्यांचं ब्रेक अप झालं. अशा बातम्या व्हायरल झाल्या होत्या. ते मात्र मुनावरला आवडलेलं नाही. त्यामुळे तो संतप्त झाल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT