Munmun Dutta Instagram
मनोरंजन

ट्रोलरच्या अश्लील प्रश्नावर 'तारक मेहता..' च्या बबिताची शिवीगाळ

मुनमुन दत्ताच्या या प्रतिक्रियेने तिचे चाहते मात्र भलतेच खूश झाले आहेत.

प्रणाली मोरे

मुनमुन दत्ता (Munmun Dutta) गेल्या १३ वर्षांपासून प्रसिद्ध मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Tarak Mehta Ka Ulta Chashma) या मालिकेत बबिता ही भूमिका साकारत आहे. तिनं या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मन केव्हाच जिंकलं आहे. इन्स्टाग्रामवरही तिचे जवळपास ६.७ मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. तसं पाहिलं तर मुनमुन दत्ता सोशल मीडियावर राज्य करते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तिच्या पोस्ट पहायला तिचे फॉलोअर्स नेहमीच उत्सुक असतात. पण तरिही ट्रोलर्सकडून मात्र अनेकदा तिला ट्रोल व्हावं लागतं. एकदा तर झालं असं की एका ट्रोलरने तिच्या पोस्टवर खूप अपमानास्पद भाषेत प्रतिक्रिया लिहिली जे वाचून मुनमुन तिला उलट-सुलट बोलणाऱ्यांवर भयंकर चिडली होती.

२०१८ मध्ये मुनमुन दत्ता ने 'तारक मेहता का उलटा चष्मा' या मालिकेच्या सेटवर तिनं घातलेल्या पिवळ्या रंगाच्या घागरा-चोळीतल्या ड्रेसवर एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्या फोटोवर तिच्या चाहत्यांकडून प्रशंसा करणाऱ्या प्रतिक्रिया आल्या होत्या पण तेव्हाच एका ट्रोलरने अत्यंत गलिच्छ भाषेत प्रतिक्रिया दिली होती. ज्यामुळे तिचे चाहतेही त्या ट्रोलरवर भडकलेले पहायला मिळाले. त्या ट्रोलरने मुनमुन दत्ताच्या त्या फोटोवर प्रतिक्रिया देताना म्हटले होते की,''एक रात का कितना?'' आता ही भाषा किती खालच्या दर्जाची हे आपल्याला वाचून कळालेच असेल. पण मुनमुननेही त्या ट्रोलरला सोडले नव्हते. तिने सुद्धा त्या ट्रोलरचा चांगलाच समाचार घेतला होता. ती असं काही पलटवार करताना बोलून गेली होती की ते तो आजतागायत विसरला नसेल.

तसं पाहिलं तर मुनमुन नेहमीच ट्रोल करणाऱ्यांकडे एकतर कानाडोळा करताना दिसली आहे किंवा तिनं कधीच उलट उत्तर करताना भाषेची पातळी घसरवलेली दिसली नाही. पण या ट्रोलरच्या प्रतिक्रियेवर मात्र तिनं शिव्यांचा भडीमार केलेला दिसून आला. त्यानंतर ती बोलून गेली की ,'तुला ब्लॉक करायच्या आधी तुझी लायकी तुला दाखवायची होती. एवढी हिम्मत असेल ना तर समोर ये आणि बोलून दाखव''. त्यानंतर तिनं ज्याप्रकारे त्याला सुनावलं होतं ते मात्र तिची ती पोस्ट इथे बातमीत जोडली आहे त्यात सविस्तर संभाषण वाचायला मिळेल. मुनमुन नेहमीच खुप इंटरेस्टिंग पोस्ट सोशल मीडियावर शेअर करीत असते. तिनं आपल्या चाहत्यांची आवड बरोबर ओळखली आहे. पण सध्या मात्र पुन्हा मुनमुन तिच्या एका जुन्या वादग्रस्त पोस्टवरुन चर्चेत आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आज अचानक उतरले सोन्याचे दर! किती हजारांनी स्वस्त झालं, पाहा एका क्लिकवर

Nashik News : नाशिक रोड परिसरात धक्कादायक घटना: मुंबई-हावडा एक्सप्रेसखाली उडी घेऊन प्रेमीयुगुलाने जीवन संपवले

India vs Pakistan Asia Cup : 'ऑपरेशन सिंदूर'वरून भारताला डिवचणाऱ्या पाकिस्तानच्या खेळाडूंनी किती धावा केल्या? पाहा स्कोअर कार्ड..

BJP Protest : मोदींच्या आईचा AI व्हिडिओ; भाजप महिला आघाडीचे काँग्रेसविरोधात आंदोलन

Latest Marathi News Updates : मुंबईतील ड्रंक एंड ड्राईव्ह प्रकरणातील जखमीचा मृत्यू, आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

SCROLL FOR NEXT