The musical drama of  Yayati and Devyani is now in English
The musical drama of Yayati and Devyani is now in English 
मनोरंजन

‘ययाती आणि देवयानी’ संगीतनाटक आता इंग्रजीत

सकाळवृत्तसेवा

पुणे : ‘हे सुरांनो चंद्र व्हा, चांदण्यांचे कोष माझ्या प्रियकराला पोचवा..’ या अजरामर गिताने अभिजात ठरलेल्या ‘ययाती आणि देवयानी’ हे संगीतनाटक आता इंग्रजीतून येत आहे. संगणक अभियंत्याचे पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या निनाद मारूतराव जाधव या नाट्य अभिनेत्याने हाअनुवाद केला असून, त्याचे प्रयोगही लवकरच करण्याचा त्यांचा मानस आहे.

मराठी भाषा दिनी शनिवारी (ता. २७) सकाळी ११ वाजता नवी पेठेतील पत्रकार संघात या भाषांतराचे प्रकाशन करण्यात येणार आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेते,लेखक आणि दिग्दर्शक सतीश आळेकर उपस्थित असतील. भाषांतराचा उद्देश्यसांगताना जाधव म्हणतात, ‘‘मराठी संगीत नाटक अमराठी लोकांपर्यंत पोचावेआणि आपल्या समृद्ध नाट्यकलेचा त्यांनाही आस्वाद घेता यावा म्हणून हा प्रयत्न. भाषांतर प्रसिद्ध झाल्यानंतर देशातील नाट्यसंस्था, विद्यापीठेआणि अभ्यासकांना हे पुस्तक पाठवणार आहे. शिवाय हा इंग्रजीत नाट्यप्रयोग करण्याचाही आमचा विचार आहे.’’ भाषांतरासाठी प्राध्यापिका विनया बापच यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांनी भाषांतर काळजीपूर्वक तपासून सूचना केल्या, त्यानंतरच ही भाषाकृती पूर्ण झाल्याचे जाधव सांगतात. ‘ययाती आणि देवनायी’ नाटकातील ययातीची भूमिका जाधव साकारतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भाषांतराचे वैशिष्ट्ये ः
- गद्य आणि पद्य दोन्हींचेही इंग्रजी भाषांतर
- निवडक संगती नाटकांचेच आजवर भाषांतर झाले
- अभ्यास आणि प्रयोगासाठी हे पुस्तक उपलब्ध
- लेखक वि.वा. शिरवाडकरांच्या भाषा आणि काव्याचे सौंदर्याला साजेसे भाषांतर

मोठी बातमी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुण्यात खासगी खटला दाखल


ययाती आणि देवयानी ही शब्दकृती उभी करतानाची तात्यासाहेब शिरवाडकरांची
भाषा आणि काव्याचे सौंदर्य अपूर्व आहे. त्याला भाषांतरित करणे फार
आव्हानात्मक होते. लॉकडाउनच्या अवघ्या काही दिवस आधी सुरू केलेले हे
भाषांतर याच महिन्यात पुर्ण झाले. भविष्यात अधिकाधिक संगीत नाटके
इंग्रजीत उपलब्ध व्हावीत यासाठी प्रयत्नशील असेल.
- निनाद जाधव, लेखक आणि नाट्यअभिनेते
---------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT