actress savita bajaj  Team esakal
मनोरंजन

अखेर रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, ज्येष्ठ अभिनेत्री घरी परतली

कोरोनाचा मोठा फटका मनोरंजन क्षेत्रावर झाल्याचे दिसुन आले आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनाचा मोठा फटका मनोरंजन क्षेत्रावर झाल्याचे दिसुन आले आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रेटींना नैराश्यातून जावे लागत आहे. त्यात मोठमोठ्या सेलिब्रेटींचा समावेश आहे. कोरोनानं कित्येक मालिका आणि रियॅलिटी शो चे चित्रिकरण बंद पडले. आता काही अंशी ते सुरु आहेत. मात्र त्याचा परिणाम बॅक स्टेज आर्टिस्टवर झाला आहे. आपल्या जवळ औषधाला देखील पैसे नसल्याची खंत काही कलाकारांनी व्यक्त केली आहे. त्यात अभिनेत्री सविता बजाज यांच्या नावाचा समावेश आहे. त्यांना अभिनेता सोनु सुदनं मदतीचा हात दिला होता. आता त्या आजारपणातून बाहेर आल्या आहेत. (nadia ke paar fame actress savita bajaj was discharged from the hospital yst88)

नदिया के पार फेम अभिनेत्री सविता बजाज (savita bajaj) हे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेडिंगचा विषय आहे. त्यांना आर्थिक संकटाला सामोर जावं लागलं आहे. यामुळे त्या सर्वांच्या चर्चेचा विषय आहे. त्यावर कित्येक सेलिब्रेटींनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आता सविता बजाज यांना उपचारासाठी आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले होते. आपल्या आजारपणामुळे त्यांना वेगवेगळ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. पैशांची जाणवणारी तंगी, त्याचा प्रकृतीवर झालेला परिणाम यामुळे सविता बजाज वेगळ्या परिस्थितीतून जात आहेत.

सविता बजाज चर्चेत आल्या आहेत त्याचे कारण म्हणजे , गेल्या काही दिवसांपासून त्यांनी आपल्याला जाणवणाऱ्या अडचणीबद्दल भाष्य केले आहे. आर्थिक संकंटांना तोंड द्यावं लागत असल्यानं त्यांनी त्याविषयी खंत व्यक्त केली आहे. वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये सविता बजाज यांनी काम केले आहे. कोरोनाच्या काळात त्यांच्याकडील पैसे संपल्यानं त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता.

काही दिवसांपूर्वी त्यांना आयसीयुमध्ये भरती करण्यात आले होते. मात्र त्याचे पैसे देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. दवाखान्यात असताना प्रत्येकवेळी पैशांची चणचण जाणवत असल्यानं त्यांची चिडचिड होत होती. त्यावेळी त्यांच्याबरोबर अभिनेत्री नुपूर अलंकारही होती. तिनं त्यांचा सांभाळ केला. तिनं सोशल मीडियावरही त्याविषयी लिहिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

OCD Explained: OCD म्हणजे फक्त स्वच्छतेशी संबंधित नाही! डॉक्टरांनी सांगितले ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसॉर्डरचे खरे स्वरूप

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT