Amitabh Bachchan, Nagraj Manjule Google
मनोरंजन

video:सोलापुरात १५-१६ वर्षात जे घडलं नाही,ते नागराजच्या 'झुंड'ने केलंय

प्रत्येक थिएटरबाहेर अमिताभच नाही,नागराजचेही आकाशाला भिडणारे कटआऊट्स आकर्षण ठरतायत.

प्रणाली मोरे

नागराज मंजुळे(Nagraj Manjule) दिग्दर्शित 'झुंड'(Jhund) सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात दोन मुद्दे प्रकर्षाने प्रेक्षकांना थिएटरकडे खेचून आणण्यासाठी कारणीभूत ठरतील ते म्हणजे बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) आणि मराठी सिनेइंडस्ट्रीत हिट सिनेमांची परंपरा कायम ठेवणारा,आंतरराष्ट्रीय पातळीवरही प्रशंसा कमावलेला दिग्दर्शक नागराज मंजुळे. 'झुंड' सिनेमाच्या माध्यमातून तो बॉलीवूडमध्ये आपली जर्नी सुरु करीत असल्यानं नक्कीच त्याच्याविषयी चाहत्यांच्या मनात कमालीचं कुतूहल आहे. त्यात 'झुंड' सिनेमाच्या कथानकाला नागराजनं पडद्यावर कसं मांडलंअसेल याबाबत उत्सुकता दिसून येत आहे. हा स्पोर्ट्स ड्रामा असला तरी समाजातील बुरसटलेल्या विचारांवर,व्यवस्थेवर परखड भाष्य या सिनेमाच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. सिनेमातील इतर कलाकारांच्या भूमिकांचही कौतूक होताना दिसत आहे. आमिर खानसोबतच अनेक मोठमोठ्या लोकांनी सिनेमाची भरभरुन प्रशंसा केलेली आहे.

आता सिनेमा मायबाप प्रेक्षकांच्या स्वाधीन नागराजनं केला आहे. खरंतर तेच सिनेमाचे तारणहार असं अनेकदा म्हटलं जातं. त्यांनी सिनेमाला दिलेली पसंती सिनेमा बनवणाऱ्यांसाठी सर्वात महत्तवाची असते. आज सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी नागराजच्या 'झुंड'ला कसा प्रतिसाद दिला आहे याचा पहिला दाखला हा सोलापुरात मिळाला आहे. सोलापुरात आजचं वातावरण नेहमीपेक्षा वेगळं पहायला मिळालं. सोलापुर 'झुंडमय' झालं आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

सोलापुरात(Solapur) आज आपण पाहिलं तर जेवढे थिएटर आहेत त्यांच्याबाहेर 'झुंड' सिनेमातील अमिताभ बच्चन आणि दिग्दर्शक नागराज मंजुळेचे मोठमोठे कटआऊट्स लागले आहेत. असं तब्बल चौदा-पंधरा वर्षांनी पहायला मिळत असल्याचं प्रेक्षकांनी सांगितलं. काय म्हणालाय मायबाप प्रेक्षक. त्यांच्या प्रतिक्रिया सांगणारा व्हिडीओ बातमीत जोडला आहे. सोलापुरातलं थिएटर बाहेरचं हे वातावरण पाहून आपण भारावलो असल्याची कबुली प्रेक्षकांनी दिली. आज अनेक दिवसांनी नागराजच्या सिनेमाचं झालेलं हे कौतूक लक्षवेधी ठरतंय. आता सिनेमा लोकांच्या मनावर राज्य करो म्हणजे नागराज आणि टीमची मेहनत सार्थकी लागली असं म्हणता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT