namrata sambherao birthday special post for husband yogesh SAKAL
मनोरंजन

Namrata Sambherao: माझ्या आयुष्यात एक राजकुमार आला अन्... नम्रताची पतीसाठी पोस्ट, हे आहे खास कारण

नम्रता महाराष्ट्राची हास्यजत्रेतील सर्वांची लाडकी अभिनेत्री

Devendra Jadhav

Namrata Sambherao News: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम नम्रता संभेराव सोशल मीडियावर कायमच नवनवीन पोस्ट करत असल्याने चर्चेत आहे. नम्रताने हास्यजत्रेत विविध व्यक्तिरेखा साकारुन लोकांच्या मनावर राज्य केलंय. नम्रताने नुकतंच तिच्या नवऱ्यासाठी खास पोस्ट केलीय.

सोशल मीडियावर नम्रताने पती योगेश संभेरावसाठी खास पोस्ट लिहीलीय. त्यामागचं कारणही खास आहे. जाणून घ्या.

नम्रताची नवऱ्यासाठी खास पोस्ट

नम्रता संभेरावने पती योगेशसाठी खास पोस्ट लिहीलीय. त्यामागचं कारण म्हणजे नम्रताचा नवरा योगेशचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने नम्रताने पोस्ट लिहीलीय की, "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा योगेश. मग कुठूनसा येईल राजकुमार. सफेद घोड्यावर होऊन स्वार,
"ती फुलराणी " मधलं हे स्वगत अनेकदा अनेक जणींनी सादर केलंय मी ही केलं आणि खरोखरीच माझ्या आयुष्यात एक राजकुमार आला."

नम्रता पुढे लिहीते, "माझ्या सुखात तो त्याचं सुख पाहणारा सोबती ह्या शब्दाला पुरेपूर न्याय देणारा त्याने मला दिलेलं प्रोत्साहन कौतुक प्रेम आधार मला कायम ताज तवानं ठेवते. love u yogesh कायम हसत रहा खुश रहा तुझ्या सगळ्या ईच्छा स्वप्न पूर्ण होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना."

या खास शब्दांमध्ये नम्रताने योगेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा केल्यात. नम्रताच्या या पोस्टखाली अनेकांनी योगेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

नम्रताचा आगामी सिनेमा

नम्रता आगामी एकदा येऊन तर बघा सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रसाद खांडेकरने केलंय. याशिवाय या सिनेमात तेजस्विनी पंडित, ओंकार भोजने, विशाखा सुभेदार, गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, रोहीत माने, वनिता खरात हे कलाकार झळकणार आहेत.

हा सिनेमा ८ डिसेंबरला सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी! 'सातारा जिल्ह्यातील शंभर हेक्टरवरील पिकांना फटका': अतिवृष्टीत खरीप पिकांचे मोठे नुकसान

Satara child health: 'साताऱ्यात लहान मुलांमध्ये वाढले संसर्गजन्य आजार'; सर्दी, खोकला, ताप, जुलाबाचे रुग्ण

माेठी बातमी! 'म्‍हसवडमधील १४ शेतकऱ्यांची जमीन शासनाकडे'; ३२ वर्षे माेबदलाच नाही, स्‍वखुशी’ शब्‍दाने ‘खुदकुशी’ची वेळ

Karad Crime: सोन्याचे १५ तोळे दागिने लंपास; पवारवाडीतील प्रकार, तीन तासांत हातसफाई

Healthy Morning Breakfast: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा लाल भोपळ्याचे थालीपीठ, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT