Namrata Sambherao's son video viral feels proud on Marathi language praised by netizens maharashtrachi hasyajatra  SAKAL
मनोरंजन

Namrata Sambherao: "ही अमेरिका नाही इथे मराठीच बोलायचं.." हास्यजत्रा फेम नम्रताच्या लेकाचा हट्ट!

नम्रता संभेरावच्या मुलाने आईसमोर मराठी बोलण्याचा हट्ट धरलंय

Devendra Jadhav

Namrata Sambherao Son Video: नम्रता संभेराव ही महाराष्ट्राची हास्यजत्रामधील लोकप्रिय अभिनेत्री. नम्रताने महाराष्ट्राची हास्यजत्रेत विविध भुमिका साकारुन प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं.

नम्रता सोशल मीडियावर अनेकदा तिच्या कुटुंबाशी संबंधित व्हिडीओ शेअर करत असते. अशातच नम्रताने एक व्हिडीओ शेअर केलाय. यात नम्रताचा मुलगा आईला मराठी बोलण्याचा आग्रह करताना दिसतोय.

(Namrata Sambherao's son video viral feels proud on Marathi language)

नम्रताच्या मुलाचा मराठी बोलण्याचा आग्रह

नम्रता संभेरावने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केलाय. यात तिचा मुलगा रुद्राज आईला मराठीत बोलायला सांगतोय.

"आपली अमेरिका नाहीये आई, आपली इंडिया आहे. इंडियामध्ये सगळे मराठीच बोलतात. आणि तू इंडियामध्ये बोलतेय इंग्लिश. इंडियामध्ये मराठीच बोलायचं इंग्लिश नाही बोलायचं." असं रुद्राज आईला सांगतो.

यावर नम्रता त्याला म्हणते, "मराठीच बोलू. इंग्लिश नको बोलू.

"हो आई!", असं रुद्राज आईला सांगतो. हा व्हिडीओ पाहून सर्वजण नम्रताच्या मुलाचं कौतुक करत आहेत.

नम्रता मुलाबद्दल म्हणते..

"माझ्या बाळाची मराठी बद्दलची आत्मियता आणि प्रेम बघून खूप अभिमान वाटला.
मराठी माध्यमं लोप पावत चालली आहेत ह्याची खूप खंत वाटते. आमच्या आसपास मराठी माध्यम नाही ही वाईट परिस्थिती आहे," अशा भावना या व्हिडीओखाली नम्रताने व्यक्त केल्यात.

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम नम्रता संभेराव सोशल मिडीयावर चांगलीच चर्चेत असते. नम्रताचं प्रचंड फॅन फोलोईंग आहे. नम्रता आणि तिचा मुलगा रुद्राजची जोडी सर्वांना आवडते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

Sachin Tendulkar: विनोद कांबळी सचिनपेक्षा खरंच भारी होता? भावानेच केला खुलासा; म्हणाला, 'तो असं कधीच...'

Dr. Trupti Agarwal: 'मुलं म्हणजे रिपोर्ट कार्ड नव्हे,' डॉ. त्रुप्ती अगरवाल यांचं नवं शैक्षणिक सूत्र

ST Bus conductor drunk : एसटी बसचा कंडक्टर दारूच्या नशेत धुंद; केबिनजवळ जाताच ड्रायव्हरनं...; पाहा VIDEO

Rain-Maharashtra Latest Live News Update: सीएसडीएसचे संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT