The Vaccine War Nana Patekar movie  esakal
मनोरंजन

The Vaccine War : 'नाना तुम्ही व्हॅक्सीन वॉरसाठी किती फी घेतली'? नानांच्या उत्तरातून झालं त्यांच्या मोठेपणाचं दर्शन!

नाना गेल्या काही दिवसांपासून वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द व्हॅक्सीन वॉर या चित्रपटामध्ये नानांनी महत्वाची भूमिका साकारली आहे.

युगंधर ताजणे

Nana Patekar The Vaccine War Movie Fee social media : प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांच्याविषयी जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ नानांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये नानांनी काम अभिनयाची अमीट छाप बॉलीवूडमध्ये उमटवली आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

नाना गेल्या काही दिवसांपासून वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द व्हॅक्सीन वॉर या चित्रपटामध्ये नानांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. त्यांनी डॉ.बलराम भार्गव यांची भूमिका केली असून त्याला चाहत्यांचा, प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. यापूर्वी नानांनी व्हॅक्सीन वॉरच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतीतून आपल्या रोखठोकपणाचा परिचय करुन दिला होता.

Also Read - Male Andropause: काय सांगता पुरुषांनाही येते रजोनिवृत्ती?

नानांनी त्या मुलाखतींमधून बॉलीवूडच्या अनेक गोष्टींवर सडेतोडपणे भाष्य केले होते. सध्याचे कलाकार, त्यांचे काम आणि चित्रपट याविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. दुसरीकडे आपण जे चूकीचे घडते आहे त्याविषयी ठामपणे भूमिका घ्यायला हवी. असे नानांनी यावेळी सांगितले होते. यासगळ्यात दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांची एक मुलाखत व्हायरल होत आहे. आजतक वृत्त वाहिनीनं घेतलेल्या या मुलाखतीतून नानांच्या मनाचा मोठेपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.

याअगोदर अग्निहोत्री यांनी आपण जेव्हा नाना पाटेकर यांना मुख्य भूमिकेत घेत आहोत असे बाकीच्या कलाकारांना सांगितले तेव्हाचा त्यांची प्रतिक्रिया काय होती हे सांगून लक्ष वेधून घेतले होते. तुम्ही नानांसोबत काम करता आहात, हे लक्षात असू द्या. ते खूपच तापट आणि करड्या शिस्तीचे आहेत. त्यांचे ऐकले नाहीतर तुमची खैर नाही.अशा शब्दांत अग्निहोत्री यांना अनेकांनी सावधही केले होते.

सुधीर चौधरी यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये अग्निहोत्री, नाना पाटेकर यांना बोलते करुन त्यांच्याविषयीच्या अनेक गोष्टी प्रेक्षकांसमोर आणल्या आहेत. पहिल्यांदा अग्निहोत्री यांनी आपण नानांना कसे भेटलो याविषयी सांगितले. ते म्हणाले, मला कळलं की, नाना कोणत्या एका गावात राहतात. मग मी त्यांना भेटायला गेलो होतो. मला अगोदर त्यांच्याविषयी अनेकांनी सांगितले होते. त्यामुळे मनात भीती होती. मी त्यांना चित्रपटाची कथा सांगितली आणि त्यांनी ऐकून आपण त्यात काम करण्यास तयार आहोत हे सांगितले.

नाना तुम्ही व्हॅक्सीन वॉरसाठी किती फी घेतली असा प्रश्न जेव्हा त्यांना करण्यात आला तेव्हा ते म्हणाले, मी या चित्रपटासाठी फक्त वीस टक्के फी घेतली आहे. ८० टक्के फी मी माफ केली. कारण चित्रपटाचे टायटल आणि त्याचा विषय मला खूपच आवडला होता. त्यामुळे तो चित्रपट किती कमाई करतो, किती करेल याविषयी मला माहिती नाही. पण एक गोष्ट नक्की हा चित्रपट मी खूप मनापासून केला. अशा शब्दांत नानांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

Navi Mumbai: रिल्स बनवण्यासाठी रेल्वेवर चढला, इतक्यात ओव्हरहेड वायरला चिटकला अन्...; क्षणात आयुष्य उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT