VIRAL VIDEO: Naresh's wife Ramya Raghupathi tries to attack him & Pavithra Lokesh with slipper at a hotel Google
मनोरंजन

तेलुगू अभिनेत्याला भर हॉटेलात पत्नीनेच चपलीनं बदडवल्याचा Video Viral

नरेश हा साऊथ सुपरस्टार महेश बाबूचा सावत्र भाऊ आहे. हल्ला झाला तेव्हा त्याच्यासोबतच्या पवित्रा लोकेशलाही राम्यानं मारण्याचा प्रयत्न केला.

प्रणाली मोरे

प्रसिद्ध तेलुगू अभिनेता नरेशची(Naresh Babu) पत्नी राम्या रघुपतीनं रविवारी ३ जुलै,२०२२ रोजी म्हैसूरमधील एका हॉटेलात स्वतःच्या पतीवर आणि तिथे उपस्थित अभिनेत्री पवित्रा लोकेशला चपलीनं मारण्याचा प्रयत्न केला. तेलुगू अभिनेता नरेश आणि त्याच्या पत्नीत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते ज्या कारणामुळे राम्या रघुपती(Ramya Raghupathi) या अभिनेता असलेला पती नरेश याच्यावर रागात होत्या. परंतु या रागानं हिंसक वळण घेतलेलं सर्वांनी पाहिलं जेव्हा राम्या म्हैसूर येथील हॉटेलात पोहोचल्या जिथे अभिनेता नरेशसोबत अभिनेत्री पवित्रा लोकेश देखील उपस्थित होती. राम्या रघुपतीनं नरेश यांना चप्पलनं मारण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.(VIRAL VIDEO: Naresh's wife Ramya Raghupathi tries to attack him & Pavithra Lokesh with slipper at a hotel)

ऑनलाइन शेअर केलेल्या आणि एका न्यूज चॅनेल्स द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या या व्हिडीओत अभिनेता नरेश आणि अभिनेत्री पवित्रा हॉटेलच्या रुममधून बाहेर येताना दिसत आहेत. यादरम्यान राम्या,नरेशला मारण्याचा प्रयत्न करताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. अर्थात,तिथे पोलिस त्याक्षणी उपस्थित होते त्यामुळे त्यांनी नरेश,पवित्रा यांना वाचवण्याच्या हेतूने राम्या यांना पकडलं. याव्यतिरिक्त या व्हिडीओत दिसत आहे की नरेश,राम्याची मस्करी करत शिटी वाजवत-वाजवत लिफ्टमध्ये प्रवेश करत आहे आणि त्यावेळी त्याच्यासोबत पवित्रा लोकेश आणि सुरक्षा रक्षक देखील उपस्थित आहेत. या दरम्यानं तो तेलुगू भाषेत काहीतरी ओरडताना दिसत आहे,जे आपल्याला व्हिडीओत ऐकू देखील येईल. तिथे उपस्थित लोकांनी राम्या आणि नरेश यांच्यातील तो वाद सोडवण्याचा प्रयत्न देखील केला आणि राम्या रघुपतिला शांत करुन तिथून पाठवण्यात आलं.

नुकत्याच समोर आलेल्या एका वृत्तानुसार साऊथ सुपरस्टार महेश बाबूचा सावत्र भाऊ नरेशनं पवित्रा लोकेशसोबत लग्न केल्याची बातमी होती. मात्र शनिवारी याचं खंडन करत नरेशने एक व्हिडीओ मेसेज शेअर करुन दावा केला आहे की या सगळ्या अफवा राम्यानं पसरवल्या आहेत. नरेशनं हे देखील सांगितलं की राम्यानं त्याला घटस्फोटाची नोटीस देखील पाठवली आहे. राम्यानं नरेशला बदनाम करण्यासाठी खूप प्रयत्न केल्याचं देखील तो म्हणाला आहे. तसंच, पवित्रा लोकेशने देखील या सगळ्या अफवांना पूर्णविराम देत राम्यालाच खोटं ठरवलं आहे.

तर दुसरीकडे, राम्याने गेल्या काही दिवसांत मीडियाशी बातचीत केली होती. त्यात नरेशला 'वुमनाइजर' म्हटलं होतं. तिनं दावा केला होता की पवित्रा लोकेशसोबत नरेशचे गैरसंबंध होते,त्यांनी गुपचूप लग्न देखील केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission News : केंद्रीय कर्मचारी अन् पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! DA अन् DR मध्ये लवकरच वाढीचे संकेत

Hindu Youth Killed in Bangladesh : बांगलादेशात आणखी एका हिंदू तरूणाला मारलं! २० दिवसांत कट्टरपंथीयांकडून सातवी हत्या

Pune Election: पुण्यात भाजपने नाराजांची काढली 'अशी' समजूत; तिकीट न मिळालेल्या इच्छूकांवर नवी जबाबदारी

MPSC Success : येरमाळ्याच्या वैभवची यशाची 'हॅट्ट्रिक'! तलाठी, एसटीआयनंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून 'पुरवठा अधिकारी' पदी झेप!

Caste Certificate Protest : मुलाला जातीचा दाखला नाकारला; अन् आईने टॉवरवर चढून १४ तास केले आंदोलन; पोलिसांच्या शिष्टाईने सुखरूप सुटका!

SCROLL FOR NEXT