Natu Natu, RRR, natu natu oscar, oscars 2023 SAKAL
मनोरंजन

Natu Natu ला मिळाला ऑस्कर पण कालभैरवने मागितली जाहीर माफी, काय आहे नेमकं प्रकरण?

Natu Natu गाण्याचा गायक कालभैरव याने मात्र माफी मागितली आहे.

Devendra Jadhav

Natu Natu गाण्याला ऑस्कर मिळाल्यानंतर भारतामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. Natu Natu गाण्याला ऑस्कर मिळाल्याने भारतीय चित्रपट विश्वाच्या शिरपेचात मानचा तुरा रोवला गेला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून RRR आणि ऑस्कर हा विषय प्रचंड चर्चेत आहे. पण एक विचित्र गोष्ट घडल्याने सर्वांना सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. Natu Natu गाण्याचा गायक कालभैरव याने मात्र माफी मागितली आहे.

(Natu Natu won an Oscar but the singer kaala bhairavaa apologized publicly)

RRR मधल्या Natu Natu ला ऑस्कर मिळाल्यावर कालभैरवने एक पोस्ट शेयर केली होती. त्यात लिहिले होते कि, "मला तुम्हा सर्वांसोबत काहीतरी शेअर करायचे आहे. RRR चे प्रतिनिधित्व करण्याची आणि ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीसाठी परफॉर्म करण्याची अमूल्य संधी मिळाल्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे.

त्या नोटवर, मला तुमच्यासोबत शेअर करायचे आहे. की प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या काही लोकांमुळेच, ही अमूल्य संधी मला मिळाली. त्यामुळे मी खुप आनंदी आहे"

अशी पोस्ट लिहून कालभैरवने दिग्दर्शक, संगीतकार अशा सर्वांचे आभार मानले. पण कालभैरवने RRR मधील प्रमुख अभिनेते Jr. NTR आणि Ram Charan यांचा उल्लख कालभैरवने केला नाही.

त्यामुळे नेटकऱ्यांनी कालभैरव यांच्यावर आगपाखड करत त्यांच्या टीका केली. त्यामुळे कालभैरवला त्याची चूक लक्षात आली असून त्याने सोशल मीडियावर जाहीर माफी मागितली.

माफी मागताना कालभैरव म्हणतो.."तारक अण्णा आणि चरण अण्णा हे Natu Natu आणि RRR च्या यशाचे मुख्य कारण आहेत यात शंका नाही.

पण ऑस्कर अवॉर्ड्सच्या स्टेज परफॉर्मन्ससाठी मला संधी मिळवून देण्यासाठी कोणी मदत केली याबद्दल मी फक्त बोलत होतो. अजून काही नाही. मी पाहतो की ते चुकीचे व्यक्त केले गेले आहे आणि त्याबद्दल, मी माझ्या शब्दांच्या निवडीबद्दल मनापासून माफी मागतो."

संगीतकार एमएम कीरावानी यांचं Natu Natu ऑस्करच्या सोहळ्यामध्ये सादरीकरण झालं. परदेशी कलाकारांनी Natu Natu गाण्यावर भन्नाट डान्स केला.

Natu Natu डान्स जेव्हा संपला तेव्हा ऑस्कर साठी उपस्थित असलेल्या सगळ्या कलाकारांनी आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Test Rankings: जो रुट पुन्हा 'अव्वल', संघसहकाऱ्यालाच टाकलं मागं; शुभमन गिल - रिषभ पंतचीही क्रमवारी घसरली

'मला दगडू सारखा 'अडल्ट जोक्स' करणारा मुलगा कधी व्हायचचं नव्हतं' प्रथमेश परब स्पष्टच बोलला

Aquarius Compatibility: कुंभ राशीसाठी 'मेड फॉर इच अदर' कोण? जाणून घ्या राशीनुसार नात्याचं भविष्य

Snake Video : सायलेन्सरमध्ये लपला होता खतरनाक साप, गाडी सुरू होताच पायाला...अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Updates : महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मीक कराडसह मुलाचा सहभाग, विजयसिंह बाळ बांगर यांचा आरोप

SCROLL FOR NEXT