Navya Navli Nanda Grand Daughter of Amitabh bachchan esakal
मनोरंजन

Navya Naveli Nanda : सिद्धांतसोबत नाव घेतलं जात असतानाच अमिताभ यांच्या नातीनं दिली मोठी प्रतिक्रिया, 'लग्न झाल्यावर...'

बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असते.

युगंधर ताजणे

Navya Navli Nanda Grand Daughter of Amitabh bachchan : बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून ती प्रसिद्ध अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीसोबतच्या रिलेशनशिपमुळे लाईमलाईटमध्ये आली आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

एका मुलाखतीमध्ये नव्यानं तिच्या लग्नाविषयी आणि करिअरबाबत खुलासा केला आहे. चाहत्यांनीही तिला शुभेच्छा दिल्या आहे. मात्र तिचा जीवनसाथी कोण असणार याबाबत अजून कोणतीही खात्रीशीर माहिती पुढे आलेली नाही. एका पॉडकास्टच्या कार्यक्रमात ती गेली असताना त्यावेळी तिनं काही गोष्टींविषयी परखडपणे तिची मतं व्यक्त केली आहेत.

Also Read - Male Andropause: काय सांगता पुरुषांनाही येते रजोनिवृत्ती?

नव्यानं तिच्या आगामी काळातील प्रोजेक्ट विषयी बोलताना म्हटले की, सध्या माझे लग्नाचे प्लॅनिंग आहे. लग्न करणार, मोठे कुटूंब असणार. मात्र यासगळ्यात माझे करिअर मला सगळ्यात महत्वाचे आहे.त्याकडे दुर्लक्ष होणार नाही याचीही मी काळजी घेणार आहे. ई टाईम्सनं दिलेल्या या वृत्तानुसार नव्या आता लग्नाची तारीख कधी घोषित करणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

नव्यानं यावेळी तिच्या प्रोफेशन लाईफवरुन देखील प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणते की, मला असे वाटत नाही की, सध्या माझा फारच वाईट काळ सुरु आहे. पण मला तो एखाद्या आव्हानासारखा वाटतो. वयाच्या २१ व्या वर्षी मी पदवीधर झाले. आता मी मला जे योग्य वाटते ते करण्यावर भर देते. भारतातील किती मुलींना त्यांना जे करावेसे वाटते ते करण्याची संधी मिळते, हा प्रश्न मला नेहमीच अस्वस्थ करत आला आहे.

एप्रिल २०२२ मध्ये नव्या आणि सिद्धांत हे एका सिक्रेट व्हॅकेशनला गेले होते. मात्र त्याचे फोटो काही सोशल मीडियावर व्हायरल झाले नव्हते. जेव्हा त्यांनी ते फोटो बऱ्याच दिवसांनी शेयर केले तेव्हा त्या दोघांच्या फोटोंमधील बॅकग्राउंड सारखेच असल्याचे दिसून आले होते. त्यावरुन नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवातही केली होती. त्यानंतर जूनमध्ये ते दोघेही एकत्र मुव्हीला जातानाचे फोटोही समोर आले होते.

गेल्या काही दिवसांपासून सिद्धांत आणि बच्चन कुटूंबीय यांच्यात जवळीकता वाढल्याचे दिसून येत आहे. बऱ्याचशा इव्हेंटस मधून सिद्धांत हा अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यासोबत व्हिडिओ शेयर करताना दिसून आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यावरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT