nawazuddin 
मनोरंजन

या कारणामुळे नवाजुद्दीनने केला मुंबई ते उत्तर प्रदेश प्रवास, भावानेच केला खुलासा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. अशामध्येच आता देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा देखील सुरू झाला आहे. ज्यामुळे सामान्य व्यक्तींपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांनाच घरातच राहणं गरजेचं झाले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाने घरातच राहून सरकारला सहकार्य करणं तितकंच गरजेचं आहे. लॉकडाऊनमध्ये सगळं काही बंद असताना एका नव्या चर्चेचा उधाण आलं. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या उत्तर प्रदेशामधील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील बुढाना या गावी पोहचला. तो गावी गेल्यानं नवाज ईद हा सण साजरा करण्यासाठी गावी गेल्याच्या चर्चा सर्वत्र सुरु झाल्या होत्या.

मात्र या सुरु असणाऱ्या चर्चांमध्ये खरंच तथ्य आहे का याचा आता खुलासा झाला आहे. नवाजचा भाऊ शमास सिद्दीकीने नवाजचं गावी जाण्याचं नेमकं कारण काय आहे हे सांगितलं आहे. त्याने ट्विट करत याची माहिती दिली आहे. नवाजुद्दीनची आई आजारी असल्याने नवाज गावी गेला आहे, ईद साजरी करण्यासाठी नाही असे नवाजचा भाऊ शमासने ट्विट करत सांगितले आहे. शमास ट्विट करत म्हणाले की, 'काही महिन्यांपूर्वी आमच्या बहिणीचे कॅन्सर या आजाराने निधन झाल्यानंतर आमची आई आजारी आहे. यामुळे नवाजुद्दीनला आईजवळ बुढानाला जावं लागलं आहे. तो तिकडे ईद साजरी करण्यासाठी गेलेला नाही.' या ट्विटसोबत त्याने एक कागदपत्र देखील जोडले आहे.

ज्यामध्ये नवाजने महाराष्ट्र सरकारकडून परवानगी घेऊन त्याच्या वैयक्तिक गाडीतून मुंबई ते बुढाना असा प्रवास करू शकतो असे लिहिले आहे. नवाजने हा प्रवास त्याच्या वैयक्तिक गाडीने केला असून त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबाने देखील प्रवास केला आहे. मुंबई ते उत्तर प्रदेश असा प्रवास केल्याने त्याला त्याच्या कुटुंबासोबत चौदा दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे.

नवाज गावी पोहचल्यावर त्याच्या संपूर्ण कुटुंबाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर त्याला कुटुंबासह होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. गावी जाण्यापूर्वी त्याने महाराष्ट्र सरकारकडून गावी जाण्याची परवानगी मागितली होती आणि तेथे पोहचल्यानंतर तो कुटुंबासह गावी आल्याची माहिती त्याने जिल्हा प्रशासनाला दिली होती.

nawazuddin siddiqui reached budhana not to celebrate eid says his brother

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT