nawazuddin siddiqui says bollywood parties have a lot of fakeness  sakal
मनोरंजन

Nawazuddin Siddiqui: बॉलिवूड मधली ही गोष्ट खटकते नवाजला.. म्हणून आहे चार हात लांब..

नवाझउद्दीन सिद्दीकी सध्या त्याच्या 'हड्डी' या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे.

नीलेश अडसूळ

Nawazuddin siddiqui: सध्या बॉलीवुडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला नट म्हणजे नवाजउद्दीन सिद्दीकी. त्याचा दमदार अभिनय आणि साधेपणा याची सर्वांनाच भुरळ पडली आहे. लवरकच तो एका आगळ्या वेगळ्या भूमिकेत आपल्या भेटीला येत आहे. 'हड्डी' या चित्रपटात तो तृतीयपंथी व्यक्तीची भूमिका साकारत आहे. या लुकच्या निमित्ताने नवाझ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचा एक लुक काल रिवील झाला आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. आज नवाज बॉलीवुडमध्ये सक्रिय असला तरी बॉलीवुडमधल्या काही गोष्टी त्याला चांगल्याच खटकतात.
(nawazuddin siddiqui says bollywood parties have a lot of fakeness)

नवाजउद्दीन सिद्दिकी आज बॉलीवुडमधला एक मोठा चेहरा असला तरी तो आपल्याला बॉलीवुडमधील पार्ट्यांमध्ये दिसत नाही. कारण त्याला अशा पार्ट्यांमध्ये जाणे चांगलेच खटकते. याविषयी एका मुलाखतीत नवाजुद्दीनने यामागचं कारण सांगितलं. होतं. अशा पार्ट्यांमध्ये 'दिखावेपणा' फार असल्याने तिथं जाणं टाळत असल्याचं नवाजुद्दीन म्हणाला होता.

नवाजउद्दीन म्हणाला होता, "मी ज्या पद्धतीचे सिनेमे करतो, तसाच मी खऱ्या आयुष्यात आहे. मी साकारलेल्या भूमिका वास्तववादी असतात. असं म्हणतात ना, एखादी व्यक्ती जितकी लोकल असते, तितकाच तिचा प्रभाव ग्लोबल असतो. तुम्ही तुमच्या मुळांशी एकनिष्ठ राहिलात, तर जगातील प्रत्येक व्यक्ती तुमच्यावर प्रेम करू लागेल."

तो पुढे म्हणाला, "मी अशाच प्रकारचे सिनेमे करतो आणि माझा स्वभावही तसाच आहे. मी बनावट चित्रपटात काम करत नाही आणि माझी वृत्तीही बनावट नाही. बॉलिवूड पार्ट्यांपासून अलिप्त राहण्याचं कारण म्हणजे मला स्टारडम आणि ग्लॅमरचं जग आवडत नाही. चित्रपटसृष्टीतील कार्यक्रम किंवा पार्ट्यांमध्ये जाण्यापेक्षा मला सामान्य लोकांमध्ये राहायला आवडतं. मला तिथे खूप खोटेपणा दिसतो, जो मला आवडत नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT