nawazuddin siddiqui success story watchman to bunglow owner in mumbai sakal
मनोरंजन

Nawazuddin siddiqui: वॉचमन ते बंगल्याचा मालक.. नवाझ लेट आला पण थेट गेला..

नवाझउद्दीन सिद्दीकी सध्या त्याच्या 'हड्डी' या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे.

नीलेश अडसूळ

Nawazuddin siddiqui: बॉलिवूड मधील गंभीर भूमिका करत आपल्या अभिनयाची छाप सोडणारे नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या आगामी चित्रपटामूळं चर्चेत आहे. 'हड्डी' या चित्रपटात तो वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तो तृतीयपंथी व्यक्तीची भूमिका साकारत आहे. या लुकच्या निमित्ताने नवाझ चांगलाच चर्चेत आला आहे. नवाजच्या आयुष्याला कलाटणी मिळणारा हा चित्रपट असणार आहे. पण हे यश त्याला इतक्या सहजासहजी मिळालेले नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण एकेकाळी वॉचमन म्हणून काम करणाऱ्या नवाझने आज मुंबईत स्वतःचा आलीशान बंगला खरेदी केला आहे.

(nawazuddin siddiqui success story watchman to bunglow owner in mumbai)

बॉलिवूडचा सुपरस्टार म्हणून ओळखला जाणारा अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीचा जन्म १९ मे १९७४ रोजी उत्तर प्रदेशच्या बुढानामध्ये झाला. या अभिनेत्यानं नायकाच्या चेहऱ्याची व्याख्याच बदलून टाकली. आपल्या अभिनयाच्या जोरावर नावझनं बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. इथंपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने मोठा संघर्ष केला आहे.

१९९५ पासून नवाझ या क्षेत्रात येण्यासाठी प्रयत्न करत होता. १९९९ च्या दरम्यान त्याला चित्रपटांमध्ये काही संधी मिळू लागल्या. २०१२ पर्यंत त्याचा हा संघर्ष सुरु होता. अनुराग कश्यपच्या 'गँग्स ऑफ वासेपूर' ने नवाझच्या अभिनयाची ओळख जगाला करून दिली. नवाझनं या चित्रपटात फैजल ही व्यक्तिरेखा साकारली होती. या भूमिकेने त्याचे आयुष्य पालटले.

पण त्याच्या संघर्षाच्या काळात दैनंदिन उपजीविका करणेही त्याला मुश्किल झाले होते. त्यामुळे पोट भरण्यासाठी नवाझने चक्क वाॅचमेनची नोकरी स्वीकारली. यावेळी मेडिकलमध्ये काम आणि वॉचमनची नोकरी तो करत होता. याबाबत त्याने स्वतः एका मुलाखतीत माहिती दिली आहे.

म्हणूनच कदाचित एवढं यश मिळवूनही नवाझ सामान्य कलाकाराप्रमाणेच वागतो. त्याच्यातील साधेपणा याच संघर्षातुन आला असावा. आजही चित्रीकरण झाल्यानंतर नवाझ आपल्या गावी निघून जातो. तिथल्या माणसांमध्ये, शेतीमध्ये तो रमतो.

या मेहनतीचे फळ म्हणजे नवाझचे मुंबईतील घर. काही दिवासांपूर्वीच नवाझने मुंबईमध्ये वर्सोवा परिसरात स्वतःचा बंगला खरेदी केला. अंदाजे २०० कोटींहून अधिक किमतीचा हा बंगला असल्याचे बोलले जाते. अत्यंत आलिशान अशा या घराला त्याने उत्तर प्रदेशातील घराप्रमाणे राजेशाही लुक दिला आहे. शिवाय घराबाहेर गार्डन, अद्ययावत सुविधा याने हे घर सजलेले आहे. 'नवाब' असे या बंगल्याचे नाव आहे. ज्या माणसाने कधीकाळी वाॅचमनचे काम केले होते. तो आज अत्यंत मेहनतीने आणि चिकाटीने मुंबई सारख्या ठिकाणी एका बंगल्याचा मालक झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Success Suraiya Desai : संसार सांभाळत स्पर्धा परीक्षेत यश; कोल्हापुरची सुरैया देसाईं महिलांमध्ये राज्यात प्रथम

Pune water supply news: पुण्यात १५ टक्के पाणी कपात टाळण्यासाठी गळती रोखण्याचा महापालिकेचा प्रयत्न; समान पाणी पुरवठा योजना व स्मार्ट मीटरवर भर

Mehkar Lonigavli POCSO Case: लोणी गवळी शाळेत तिसरीतील मुलींचा विनयभंग करणारा मास्तर ग्रामस्थांच्या ताब्यातून पोलिसांच्या स्वाधीन; जिल्ह्यात संतापाची लाट

Gold Price: अमेरिकेतलं १२९ टन सोनं माघारी आणलंच नाही..! एका निर्णयाने फ्रान्सची सेंट्रल बँक तोट्यातून थेट नफ्यात

Latest Marathi News Live Update: संघाचे कार्य संघ स्वयंसेवकांच्या श्रमाने सुरु- मोहन भागवत

SCROLL FOR NEXT