Nawazuddin siddiqui video on Religion viral again related to CAA 
मनोरंजन

Video : 'मी डिएनए टेस्ट केली अन् माझ्या रक्तात...'; नवाजुद्दीनचा व्हिडिओ बघाच!

सकाळ डिजिटल टीम

सध्या सगळीकडे सीएए आणि एनसीआरविरोधात देशात गंभीर वातावरण आहे. सगळ्या गोष्टी शेवटी येऊन धर्मावर थांबत आहेत. या सर्व आंदोलनात सोशल मीडिया महत्त्वाची भूमिका साकारत आहे. याचसंबंधी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याचा तीन वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ नेटकऱ्यांना इतका भावतोय की तो त्याने सध्याच्या परिस्थितीला अनुसरूनच शेअर केला आहे की काय असे वाटते. या व्हिडिओचे नाव 'Sixteen Point Six Six' असे आहे.  

नावजुद्दीन सिद्दीकीने साधारण तीन वर्षांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तो वेगवेगळे पोस्टर हातात घेऊन आणि विविध पोशाख करून एक-एक संदेश देतोय. हे सगळे संदेश इतके पॉवरफुल आहेत, की ते तुमच्या मनावर खोल परिणाम करतात. पहिल्या पोस्टरमध्ये तो म्हणतो की, 'हाय मी नवाजुद्दीन सिद्दीकी.' दुसऱ्या पोस्टरमध्ये लिहिले आहे की, 'मी माझी डिएनए टेस्ट केली, त्याचे रिपोर्ट्स आले, त्यात लिहिले आहे की...' मग पुढे तो वेगवेगळे पोस्टर हातात धरतो व त्यावर लिहिले आहे की, 'हिंदू - 16.66%', 'मुस्लिम - 16.66%', 'सिख - 16.66%', 'ख्रिश्चन - 16.66%', 'बुद्धीस्ट - 16.66%', 'जगातील इतर सर्व धर्म - 16.66% पण...' पुढील पोस्टरमध्ये लिहिलेले असते, 'जेव्हा मी आत्म्याचा विचार करतो त्यावेळी मी 100% कलाकार असतो.' त्याच्या या व्हिडिओने पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

जामिया मिलीया हिंसाचारप्रकरणी अनेक बॉलिवूड कलाकार या आंदोलनात उतरले होते. परिणीती चोप्रा, विकी कौशल, अनुराग कश्यप, स्वरा भास्कर, राजकुमार राव, प्रियांका चोप्रा, सोनाक्षी सिन्हा, हुमा कुरेशी या सगळ्यांनीच या आंदोलनाला समर्थन दिले. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नवाजुद्दीनचा हा व्हिडिओ अत्यंत बोलका आहे व परिस्थितीशी साधर्म्य साधणारा आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: होर्मुजच्या समुद्रधुनीत भारत इराणविरुद्ध युद्धनौका तैनात करणार? ट्रम्प यांच्या आवाहनावर परराष्ट्र मंत्रालयाने दिलं उत्तर

Pune News: सुरक्षारक्षकाच्‍या सतर्कतेमुळे युवती सुखरूप परतली घरी; युवती रात्रभर अंधारात, अन् खडकवासला धरण परिसरात काय घडलं!

Pune Pollution: प्रदूषण रोखण्याची घोषणा हवेतच! पुणे महापालिकेला बांधकाम प्रकल्पांवर सेन्सर बसविण्याचा विसर, धूलिकणांचा आरोग्यावर गंभीर परिणाम..

Javali politics: जावळीच्या राजकारणात शिवेंद्रसिंहराजेच'धुरंधर'; दोन्ही पदांवर भाजपचाच झेंडा, राष्ट्रवादीच्या शिल्पा शिंदे तटस्थ!

Latest Marathi Update: DRDO चे माजी शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर जासूसी प्रकरण

SCROLL FOR NEXT