Nawazuddin Siddiqui wife esakal
मनोरंजन

Nawazuddin Siddiqui wife : 'पैशांसाठी मिंधी नाही पण, त्याच्यासोबत..' नवाझुद्दीनची बायको स्पष्टच बोलली!

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाझुद्दीन सिद्धिकी हा सध्या वेगळ्याच संकटात सापडला आहे. त्याच्या संसाराला घरघर लागल्याचे दिसून येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nawazuddin Siddiquis wife Aaliya angry on actor : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाझुद्दीन सिद्धिकी हा सध्या वेगळ्याच संकटात सापडला आहे. त्याच्या संसाराला घरघर लागल्याचे दिसून येत आहे. आता त्याच्या पत्नीनं काही झालं तरी आपल्याला त्या माणसासोबत राहायचं नाही असं सांगून वेगळ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. काही दिवसांपासून नवाझुद्दीन, त्याची आई आणि सुन यांच्यातील वाद समोर आले आहेत.

नवाझुद्दीनच्या पत्नीनं आलियानं प्रॉपर्टीसाठी कोर्टात धाव घेतली आहे. दुसरीकडे नवाझुद्दीनच्या आईनं तर आलिया ही नवाझुद्दीनची पत्नीच नाही असे म्हणत पोलिसांकडे तिला मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे. मात्र या सगळ्या प्रकारानं सोशल मीडियावर नवाझुद्दीनं ट्रोल झाला आहे. त्याला नेटकऱ्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारुन भंडावून सोडले आहे.

Also Read - वेळ सिमेंट आणि बँकांच्या शेअरमध्ये अभ्यासपूर्ण गुंतवणूक करण्याची

एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, नवाझुद्दीनच्या पत्नीनं आता विभक्त होण्याचे संकेत दिले आहे. तिचे म्हणणे असे की, तिला तिच्या मुलांचा ताबा मिळावा. नवाझुद्दीनची पत्नी आलिया सिद्धीकी उर्फ झैनाब उर्फ अंजना किशोर पांडे यांनी काही दिवसांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. या प्रकरणानं आता वेगळे वळण घेतले आहे. नवाझुद्दीननं तर मुलांविषयी देखील भलतेच वक्तव्य केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून नवाझुद्दीन हा एका हॉटेलमध्ये राहतो आहे. त्यानं आलियाची भेटही घेतली होती. मात्र त्यांच्यातील वाद हा काही संपण्याचे नाव घ्यायला तयार नाही. आलियानं त्याच्यावर मुलांना सांभाळण्याविषयी जे आरोप केले आहेत त्यावर त्यानं उत्तर दिलं आहे. मी माझे शुटींग संपवून मुलांना वेळ दिला आहे. असे त्याचे म्हणणे आहे.

आलियानं नवाझुद्दीन आणि त्याची आई यांच्यावर कौटूंबिक हिंसाचाराचे आरोप केले आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या वकिलानं याविषयी माध्यमांना दिलेल्या माहितीनं बॉलीवूडमध्ये मोठी खळबळ उडाली होती. या सगळ्या प्रकरणाची कोर्टात सुनावणी झाल्यानंतर कोर्टानं नवाझुद्दीनला नोटीस पाठवली आहे.

आलियाच्या वकीलानं रिजवान सिद्धीकी यांनी सांगितले होते की, अभिनेत्यानं त्याच्या पत्नीला घरातून बाहेर काढण्याचा वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केला होता. तिच्याशी गैरवर्तन केले. बऱ्याच दिवसांपासून तिला जेवायला देखील दिले नाही. त्यामुळे तिनं त्याच्याविरोधात कोर्टाकडे न्यायासाठी अर्ज केला आहे. एवढेच नाहीतर गेल्या अनेक दिवसांपासून नवाझुद्दीननं त्याच्या मुलीच्या शिक्षणासाठी पैसे दिलेले नाहीत. असेही वकिलांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT