Nayanthara Viral Video Instagram
मनोरंजन

Viral Video: मंदिरात दर्शनासाठी गेलेली नयनतारा पब्लिकनं घेरल्यावर भडकली.. मागचा-पुढचा विचार न करता धमकी देत म्हणाली..

नयनतारा आपला पती विघ्नेश शिवनसोबत कुंभकोणम जवळील कामाक्षी अम्मन मंदिरात दर्शन करण्यासाठी गेली होती.

प्रणाली मोरे

Nayanthara Viral Video: शाहरुख खानच्या जलवान सिनेमाची अभिनेत्री आणि लेडी सुपरस्टार म्हणून ओळखली जाणारी नयनतारा काही दिवसांपूर्वीच आपला पती विघ्नेश शिवनसोबत मंदिरात पोहोचली होती,त्यावेळचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. पंगुनी उथीराम(दक्षिण भारतातील एक सण) च्या शुभ प्रसंगी हे कपल मंदिरात दर्शनासाठी पोहचलं, ज्यानंतर एका वादाचा जन्म झाला.

नयनतारा मंदिरात दर्शनासाठी गेली असताना काहीशी रागात दिसली,ज्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे, या व्हिडीओत आपण पाहू शकता की एका चाहत्यानं आपल्या कॅमेऱ्यानं अभिनेत्रीला शूट करण्याचा प्रयत्न केला,ज्यामुळे नयनाताराच्या रागावरचं नियंत्रण सुटलं.(Nayanthara Lost her temper on fan and threatened to break his phone actress video viral)

व्हिडीओत आपण पाहू शकता की चाहत्यानं नयनताराला पाठमोरं शूट करण्याचा प्रयत्न केला,ज्यामुळे अभिनेत्री काहीशी त्रस्त दिसली. माहितीसाठी इथं सांगतो की,नयनतारा आपला पती विघ्नेश शिवनसोबत कुंभकोणम जवळील कामाक्षी अम्मन मंदिरात दर्शन करण्यासाठी गेली होती.

नयनताराला पाहून लोकांनी तिला लागलीच घेरलं. त्यामुळे अभिनेत्रीला मनापासून देवाचं दर्शन घेता आलं नाही जसा तिनं विचार केला होता. नयनतारा आणि तिचा पती मंदिरात देवाचं दर्शन करण्यासाठी पुन्हा गेले,तेव्हा तर पब्लिक आवरणं कठीणच गेलं आणि नयनताराच्या रागावारचा ताबा सुटला.

नयनताराचा चाहत्यांवर चिडलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओ मध्ये पोलिस गर्दीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करताना आपण पाहू शकतो. तर विघ्नेश शिवन चाहत्यांना समजावताना दिसत आहे. पण तोपर्यंत नयनताराचा संयम मात्र सुटतो आणि ती एका चाहत्याला त्याचा फोन तोडण्याची धमकी देताना दिसते,जो तिला शूट करत होता.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी अभिनेत्रीच्या तशा वागण्याचं समर्थन केलं तर काहींनी मात्र ट्रोल केलं. नयनताराला काही दिवसांपूर्वी हॉरर थ्रिलर 'कनेक्ट' मध्ये पाहिलं गेलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaidyanath Karkhana: स्व. मुंडेंनी लेकराप्रमाणे जपलेला वैद्यनाथ कारखाना पंकजा मुंडेंनी कवडीमोल भावात का विकला? बेकायदेशीर खरेदीखत दोन महिन्यांनंतर उघड

'चंद्रमुखी' हे गाणं आशिषने नव्हे मी बसवलंय... नृत्य दिग्दर्शिका दीपाली विचारेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाल्या, 'त्याने फक्त रील केली आणि...'

Pune Crime : पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याला टोळक्याकडून जबर मारहाण, रात्री ड्यूटी संपवून घरी निघाला अन्...

नोकरी लावतो म्हणून बेरोजगारांना गंडा, १० कोटींच्या फसवणूक प्रकरणी अटक; आरोपी दोन मराठी चित्रपटांचा निर्माता

Cricketer Died: संघाला जिंकवलं, मात्र जीव गमावला! शेवटचा चेंडू टाकल्यानंतर गोलंदाज अचानक मैदानात कोसळला अन्...

SCROLL FOR NEXT