Nayanthara news  esakal
मनोरंजन

Nayanthara : 'मुख्य भूमिकेसाठी निर्मात्यानं मला तर...' टॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

आता टॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारानं एका मुलाखतीमधून जळजळीत खुलासा केला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तर मोठा धक्का बसला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nayanthara tollywood actress share casting couch : चित्रपट, टीव्ही मनोरंजन विश्वातील कित्येक अभिनेत्रींना निर्माते आणि दिग्दर्शकांकडून कास्टिंग काऊचला सामोरं जावं लागलं आहे. काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री तनुश्री दत्तानं आपल्यावर झालेल्या अत्याचाराविषयी सांगितले होते. त्यानंतर बॉलीवूडमधल्या बऱ्याचशा त्या गोष्टी समोर आल्या होत्या.

आता टॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारानं एका मुलाखतीमधून जळजळीत खुलासा केला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तर मोठा धक्का बसला आहे. चक्क नयनताराच्या बाबत अशा प्रकारचा प्रसंग घडू शकतो यावर त्यांचा विश्वास बसलेला नाही. नयनतारानं आपल्याला जेव्हा प्रमुख भूमिकेसाठी विचारणा झाली तेव्हा आपण त्याला होकार दिला. मात्र ती भूमिका करण्यासाठी निर्मात्यानं जी मागणी केली ही घृणास्पद होती.

Also Read - ..तर जाईल हे वर्ष आर्थिकदृष्ट्या चांगले

गेल्या काही दिवसांपासून नयनतारा ही चर्चेत आली आहे. आता तर तिनं तिच्याबाबत घडलेल्या कास्टिंग काऊचविषयी खुलासा केला आहे. त्यामुळे चित्रपटविश्वामध्ये खळबळ उडाली आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळातच आपल्याला अशाप्रकारे वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरं जावं लागलं असेही नयनतारानं त्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. नयनतारा आगामी काळात शाहरुख खानच्या जवानमधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

नयनतारानं त्या निर्मात्याचे नाव घेतलेलं नाही. मात्र त्यानं प्रमुख भूमिका देण्यासाठी ज्या मागण्या ठेवल्या त्या मला पूर्ण करता येणार नव्हत्या. त्यामुळे ती फिल्म माझ्या हातातून गेली. त्याची खंत नाही. पण मी त्या अमिषाला बळी पडली नाही. हे माझ्यासाठी समाधानकारक म्हणावे लागेल अशा शब्दांत नयनतारानं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT