Ncp Ajit Pawar News kokan hearted girl ankita walawalkar On Maharashtra Political Situation Sharad Pawar SAKAL
मनोरंजन

Maharashtra Politics: महाराष्ट्राचं राजकारण कमी, गजकर्ण जास्त.. कोकण हार्टेड गर्लची पोस्ट व्हायरल

कोकण हार्टेड गर्ल म्हणून लोकप्रिय असलेली अंकिता वालावलकरने मिश्किल अंदाजात टिपणी केलीय

Devendra Jadhav

Kokan Hearted Girl on Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात काल रविवारी २ जुलैला मोठी घटना घडली.

महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप झाला. अजित पवार यांनी इतर आमदारांसोबत उप मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एकूणच राजकारणाचं चित्र काल पालटलं. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला मोठा धक्का बसलाय.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यादाच दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री अशी स्थिती आहे. या सर्व राजकीय घटनांबद्दल कोकण हार्टेड गर्ल म्हणून लोकप्रिय असलेली अंकिता वालावलकरने मिश्किल अंदाजात टिपणी केलीय.

(Ncp Ajit Pawar News kokan hearted girl ankita walawalkar On Maharashtra Political Situation Sharad Pawar)

अंकिताने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. या व्हिडिओत अंकिता म्हणते.. "तर guys. महाराष्ट्राचं राजकारण कमी अन् गजकर्ण जास्त झालेला असा. या गजकर्णात आपण खूप काही शिकण्यासारखे असा.

म्हणजे गेल्या पाच वर्षात सगळ्यांनी वाटून महाराष्ट्र खाल्लेले हा. त्याच्यामुळे तुमच्या मताचं तसाही काही आदर नाही. त्यामुळे स्वतःची मत आहेत ती देणं जरा कमी कारा.

अंकिता पुढे म्हणते.. "लोकांचे कमेंट सेक्शन जे भरतास त्यालाही कोणी विचारू नाही. तुमच्या मताला कोण विचारत नाही तर तुमच्या कमेंटला कोण विचारतो. हाही तुम्ही विचार करा. आणि मेन म्हणजे आता हा रिल स्टार साठी कंटेंट आहे.

म्हणजे दर पावसात महाराष्ट्राचे राजकारणी आम्हाला कंटेंट देतं. म्हणजे ओके मध्ये एकदम झालं आता पण ही भाकरी पलटली, उलटली. तवो करापलो. काय वाटोळं केल्यानी. रविवारची सोय झालेली असा. तर आता बघुया पुढच्या रविवारी काय घडतंय.

अशा घडामोडी या महाराष्ट्रात चालत राहतील. या राजकारणाची तुमका आता सवय करुक घेऊक हवी." असा व्हिडिओ अंकिताने पोस्ट केलाय.

कोकण हार्टेड गर्ल म्हणून अंकिता वालावलकर प्रसिद्ध आहे. अंकिता सोशल मीडियावर विविध विषयांवर व्हिडिओ आणि रील बनवत असते. अंकिताचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असतात. अंकिताला अनेकदा ट्रोलिंगला सुद्धा सामोरं जावं लागलं आहे.

अंकिताने काही महिन्यांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली होती. अंकिता सोशल मीडियावर राज ठाकरेंच्या सभेबद्दल अपडेट देत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT