Jitendra Awhad On Nayanthara Movie Annapoorani  Esakal
मनोरंजन

Jitendra Awhad: रामाने मांसाहार केला होता? आव्हाडांनी दिला सुपरस्टार नयनताराच्या 'या' चित्रपटाचा संदर्भ

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे या चर्चांना पुन्हा उधाण आले.

Vaishali Patil

Jitendra Awhad On Nayanthara Movie Annapoorani: अयोध्येत प्रभू श्रीरामाचे मंदिर बांधले जात असून २२ जानेवारी रोजी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्यामुळे सर्वत्र श्रीराम भक्तीचे वातावरण आहे. त्यातच महाराष्ट्रात आता श्री रामाच्या नावावरुन वातावरण तापले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे या चर्चांना पुन्हा उधाण आले. राम हे शाकाहारी नव्हते तर मांसाहारी होते. त्यांनी 14 वर्ष वनवास भोगला होता मग ते शाकाहारी कसे असू शकतात?, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केल्याने या वादाला तोंड फुटलं.

त्यानंतर सत्ताधारी आक्रमक झाले आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत आंदोलन सुरु झाले. त्यानंतर जितेंद्र यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांच्या वक्तव्याबाबतचे दाखले दिले.

यावेळी त्यांनी साउथ सुपस्टार नयनताराच्या नुकताच रिलिज झालेल्या 'अन्नपूर्णानी - द गॉड ऑफ फूड' या चित्रपटाचा संदर्भ दिला. यावेळी ते म्हणाले की, "खरं तर मला त्या सिनेमाबद्दल बोलायचे नाही आहे. पण एक उदाहरण म्हणुन सांगतो. अन्नपूर्णानी नावाचा चित्रपट आलाय दक्षिणेतील सुपरस्टार त्या चित्रपटात आहेत. ज्यात त्यांनी वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणातला एक श्लोक सांगितला आहे आणि त्याचा अर्थही सांगितला आहे."

अन्नपूर्णानी चित्रपटात नयनतारा ही एक महत्त्वाकांक्षी शेफची भूमिका साकारत आहे. मात्र ब्राह्मण कुटूंबात जन्म झाल्यामुळे तिच्या घरी मांसाहार वर्ज असतं. मात्र तिला शेफ बनण्यासाठी मांसाहार बनवणं गरजेचं होतं.

त्यावेळी तिच्या मित्राने तिला मदत करण्यासाठी रामायणाचे आणि पौराणिक कथांचे काही संदर्भ श्लोकाद्वारे समजावले आहेत. ज्यात पुर्वी राम आणि देवतांनीही मांसाहार केल्याचे तो बोलत आहे. नयनताराचा हा सिनेमा ओटीटीवर रिलिज करण्यात आला आहे.

आता जितेंद्र अव्हाड यांनी आपल्या वक्तव्यांनंतर लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याबद्दल खेद व्यक्त केला. त्यानंतर आता हे प्रकरण थांबेल की आणखी वाढेल याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Silver Price Today: दिवाळीपूर्वी चांदीने 2 लाखांचा टप्पा ओलांडला; एकाच दिवसात 10,000 रुपयांची वाढ

Maratha Reservation : 'कुणबी प्रमाणपत्र दिल्याशिवाय कोणतीही सरकारी नोकरभरती करू नका'; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Mumbai : ठाकरे बंधूंसह मविआचे नेते पुन्हा निवडणूक आयोगाची भेट घेणार, पण शरद पवार अनुपस्थित

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसान योजनेचा 21वा हप्ता 'या' दिवशी येऊ शकतो

High Court: राज्य सरकारला दणका, 'तो' निर्णय हायकोर्टानं केला रद्द

SCROLL FOR NEXT