Neena Gupta Instagram
मनोरंजन

"लॉकडाउनमध्ये आम्ही पहिल्यांदा पती-पत्नी म्हणून एकत्र राहिलो"

नीना गुप्ता त्यांच्या आणि पतीच्या नात्याबद्दल व्यक्त झाल्या.

स्वाती वेमूल

आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री नीना गुप्ता Neena Gupta या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या आणि पतीच्या नात्याबद्दल व्यक्त झाल्या. गेल्या वर्षी लॉकडाउनमध्ये Lockdown आम्ही पहिल्यांदा पती आणि पत्नी म्हणून एकमेकांसोबत वावरलो, असं त्या म्हणाल्या. नीना गुप्ता या त्यांच्या पती विवेक मेहरा Vivek Mehra यांच्यासोबत मुक्तेश्वरमधल्या घरी राहत होत्या. या दोघांची पहिल्यांदा ओळख ही लंडनहून मुंबईला येत असताना विमानात झाली. गेल्या वीस वर्षांपासून हे दोघं एकत्र असून २००८ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. (Neena Gupta says she lived as husband and wife with Vivek Mehra for the first time during lockdown)

"माझे पती दिल्लीला राहतात आणि मुंबईत राहते. त्यामुळे लॉकडाउनमध्ये पहिल्यांदाच आम्ही पती-पत्नी म्हणून एकत्र सहा महिने राहिलो. पहिल्यांदाच आम्ही एकमेकांना खूप जवळून ओळखू शकलो. एकमेकांपासून लांब राहिल्यामुळे सुरुवातीला माझी खूप चिडचिड व्हायची. ते नेहमी त्यांच्या कामात व्यस्त असायचे आणि फोनवरच आमचं बोलणं व्हायचं. पण लॉकडाउनमुळे बरंच काही बदललं. आपल्यातच आनंद कसा शोधायचा याचा मूलमंत्र मला मिळाला", असं त्या म्हणाल्या.

नीना गुप्ता यांना मसाबा ही मुलगी आहे. मसाबा ही प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. नीना आणि क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांची ही मुलगी आहे. ८० च्या दशकात या दोघांचं रिलेशनशिप खूप चर्चेत होतं. नीना यांनीच मसाबाला लहानाचं मोठं केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT