Neetu Chandra says she was offered Rs 25 Lakh to become a businessman’s ‘salaried wife’
Neetu Chandra says she was offered Rs 25 Lakh to become a businessman’s ‘salaried wife’ Google
मनोरंजन

धक्कादायक! अभिनेत्री नीतू चंद्राला 'सॅलरीड वाईफ' बनण्याची बिझनेसमनची ऑफर

प्रणाली मोरे

अभिनेत्री नीतू चंद्राने(Neetu Chandra) खुलासा केला आहे की एका बिझनेसमनने तिला २५ लाख रुपये पगार देऊन 'पगारदारी पत्नी' बनण्याची ऑफर दिली होती. नीतू चंद्रा बॉलीवूडच्या अनेक सिनेमांतून आपल्या नजरेस पडली आहे. तिनं बॉलीवूडमध्ये २००५ साली 'गरम मसाला' सिनेमातून पदार्पण केलं होतं.(Neetu Chandra says she was offered Rs 25 Lakh to become a businessman’s ‘salaried wife’)

नीतू चंद्राने आपल्या नव्या मुलाखतीत सांगितलं की,'' नॅशनल अॅवॉर्ड जिंकलेल्या जवळजवळ १३ कलाकारांसोबत काम करुनही माझ्याकडे ना पैसे आहेत,ना काम''. नीतू चंद्रानं आपल्याला एक तास ऑडिशन दिल्यानंतरही कसं रिजेक्ट केलं याविषयी देखील सांगितलं आहे.

नीतू चंद्राने 'गरम मसाला' सिनेमात एअर होस्टेसची व्यक्तिरेखा साकारली होती. याव्यतिरिक्त 'ट्राफिक सिग्नल', 'वन टू थ्री', 'ओय लकी,लकी ओय','अपार्टमेंट' सारख्या अनेक सिनेमांतून काम केलं आहे. 'कुछ लव जैसा' हा तिचा नुकताच येऊन गेलेला सिनेमा. यामध्ये शेफाली शहा,राहुल बोस,सुमित राघवन सोबत ती दिसली होती. 'ओय लकी,लकी ओय' ला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. तिचा सिनेमा 'मिथिला मखाना' देखील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमा आहे.

एका हिंदी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री नीतू चंद्राने म्हटलं आहे की,'' मी नॅशनल अॅवॉर्ड विनर्स असलेल्या अनेक कलाकारांसोबत काम केलं आहे पण आज माझ्याकडे काम नाही. मला एकदा एका मोठ्या बिझनेसमनने म्हटले होते की,मी तुला महिन्याला २५ लाख रुपये देईन,माझी 'सॅलरीड वाईफ' बन त्यानंतर मी आजपर्यंत लग्न केलेले नाही. आज माझ्याकडे ना पैसे आहेत,ना काम. मला आश्चर्य वाटतं की मी इतक्या सिनेमात काम करुनही लोकांनी मला स्विकारलं नाही. आज हिच चिंता मला भेडसावत आहे''.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Crash: निवडणुकीतील अनिश्चिततेमुळे निर्देशांकांची दीड टक्का घसरगुंडी; सेन्सेक्स १०६२ अंश घसरला

Blog : दाभोलकरांनंतर... युएन ते युगांडाकडून दखल, दोन कायदे अन् शाखांचा विस्तार

PBKS vs RCB : आरसीबीच्या गोलंदाजांनी सामना आणला खेचून, प्ले ऑफच्या आशा ठेवल्या जिवंत

Air India Express च्या केबिन क्रूचा संप संपला, 25 कर्मचाऱ्यांची बडतर्फी मागे घेणार

Virat Kohli PBKS vs RCB : पंजाब विराटवर फारच मेहरबान! पाच षटकात सोडले तीन कॅच; पाहा Video

SCROLL FOR NEXT