neha angad 
मनोरंजन

नेहा धुपियाकडे पुन्हा 'गुड न्यूज'! दुसऱ्यांदा होणार आई

सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत दिली आनंदाची बातमी

स्वाती वेमूल

अभिनेत्री नेहा धुपिया Neha Dhupia दुसऱ्यांदा आई होणार असून गरोदर असल्याची गोड बातमी तिने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली. नेहा आणि तिचा पती अंगद बेदीने Angad Bedi खास फोटो पोस्ट करत ही आनंदाची बातमी सांगितली. नेहा आणि अंगद यांना दोन वर्षांची मुलगी आहे. तिचं नाव मेहेर असं आहे. सोशल मीडियावर मेहेरसोबतचा हा 'क्यूट फॅमिली फोटो' पोस्ट करत अंगदने लिहिलं, 'नवीन होम प्रॉडक्शन लवकरच..' या फोटोमध्ये नेहाचा बेबी बंप दिसून येत आहे. नेहा आणि अंगदने हा फोटो पोस्ट करताच नेटकऱ्यांसह सेलिब्रिटींनीसुद्धा शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Neha Dhupia and Angad Bedi to welcome second baby shares good news with fans slv92)

नेहा आणि अंगदने २०१८ मध्ये गुपचूप लग्न केलं होतं. लग्नाआधीच नेहा गर्भवती असल्याने तडकाफडकी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचं नंतर स्पष्ट झालं. नोव्हेंबर २०१८ मध्ये नेहाने मुलीला जन्म दिला. त्यावेळी गरोदर असल्याची बातमी सहा महिन्यांपर्यंत सर्वांपासून लपवून ठेवल्याचा खुलासा नेहाने एका मुलाखतीत केला होता. 'मी गरोदर असल्याचं कळताच मला कोणी काम देणार नाही. माझ्याबद्दल चुकीचं मत बनवतील अशी भीती मला सतत होती, म्हणूनच मी गरोदर असल्याचं कोणाला सांगितलं नव्हतं', असं तिने कबुल केलं होतं.

नेहाने 'सिंग इज किंग', 'तुम्हारी सुलू', 'हिंदी मीडियम', 'लस्ट स्टोरीज' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तर अंगदने 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल', 'सूरमा', 'पिंक', 'डिअर जिंदगी', 'टायगर जिंदा है' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: चिमुकली हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आक्रमक; आरोपीवर कठोर कारवाई, फास्ट ट्रॅक कोर्टासाठी हालचाली

IND vs SL 1st Test: "तूझ्यात हिंमत असेल ना तर..."; Yashasvi Jaiswal श्रीलंकेच्या फलंदाजाला भिडला, हायव्होल्टेज ड्रामा; नेमकं काय झालं?

अमित भानुशाली मालिका सोडतोय? ‘ठरलं तर मग’मध्ये मोठा ट्विस्ट; नवा प्रोमो पाहून प्रेक्षकांना पडला प्रश्न; म्हणाले-

Miraj Encroachment Drive: मिरज स्टॅंड चौकातील अतिक्रमणांवर हातोडा; परिसरात तणाव : महानगरपालिकेच्या गाळ्यात अवैध व्यवसाय आढळल्यास कारवाई

Marathi News Live Updates : मालेगाव-चाळीसगाव मार्गावर एसटी बस आणि आयशरची धडक; एकाचा मृत्यू, १० जखमी

SCROLL FOR NEXT