Neha Kakkar talks about relationship of her And Aditya Narayan 
मनोरंजन

नेहा कक्करचा आदित्य नारायणबाबत मोठा खुलासा, सांगतेय लग्न कधी होणार...

वृत्तसंस्था

नेहा कक्कर आणि आदित्य नारायण यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे इंडियन
आयडल ११च्या टीआरपीमध्ये मोठी वाढ झालीये. या शो दरम्यान या दोघांच्या लग्नाचे विधी देखील चालू झाले होते, मात्र नंतर हे लग्न काही झालं नाही.. या सगळ्यावर गायिका नेहा कक्करने एका मुलाखतीत आदित्य नारायणच्या
लग्नाबाबत मोठा खुलासा केलाय..

या मुलाखतीत तीने म्हटलंय, 'आदित्य खुपंच चांगला माणूस आहे. त्याचा स्वभाव खूपंच छान आहे. पण मला हे सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की माझा जवळचा लाडका मित्र आदीत्यचं लग्न या वर्षी त्याच्या गर्लफ्रेंडसोबत होत आहे..मी त्यांना मनापासून खूप शुभेच्छा देते आणि ही जोडी नेहमी अशीच सोबत राहावी अशी प्रार्थना करते..' नेहा आणि आदित्यच्या लग्नाच्या बातम्यांनी तेव्हा जास्त जोर पकडला होता जेव्हा त्यांचा वरमाला घालतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ इंडियन आयडल सेटवरचाच होता..हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर आदित्यने स्पष्टीकरण देखील दिलं होतं..आदित्यने एका मुलाखतीत म्हटलं होतं, 'जर मी माझ्या आयुष्यातील एवढा मोठा निर्णय घेणार असेल तर त्याची घोषणा मी स्वत: करेन..लग्न हा माझ्यासाठी खूप मोठा निर्णय आहे. मी तो लपवणार नाही. खर हे आहे की हे सगळं मस्तीमध्ये सुरु झालं पण लोकांनी ते फारच गंभीरतेने घेतलं. काही दिवसांपासून सोशल मिडीयावर बरंच काही चालू आहे जे चूकीचं आहे. मिडीयामधील कोणीही आमच्याकडे खरं जाणून घेण्यासाठी आलं नाही.. हे
सगळं केवळ एका रिऍलिटी शोच्या टीआरपीसाठी केलं गेलं होतं. शोच्या
मेकर्सने आम्हाला जे करायला सांगितलं ते आम्ही केलं मात्र ही केवळ एक
थट्टा होती..'

आदित्यच्या या स्पष्टीकरणानंतर नेहा आणि आदित्यचं एक व्हिडिओ साँग रिलीज झालं होतं ज्याचं नाव होतं गोवा बीच. या गाण्याचं दिग्दर्शन नेहाचा भाऊ टोनी कक्कर याने केलं होतं...काही दिवसांपूर्वीच आदीत्य आणि नेहाच्या लग्नावर उदित नारायण यांनी देखील आपलं मत मांडल होतं..ते सांगतात, 'हा
सगळा प्रकार इंडियन आयडल ११चा टीआरपी वाढवण्यासाठी चालू आहे कारण नेहा या शोची परिक्षक तर आदीत्य या शोचा सुत्रसंचालक आहे..'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: आचारसंहितेच्या काळातही लाडक्या बहीणींना हप्ता मिळणार, पण... १८ नोव्हेंबरची मुदत संपली तर लाभ थांबणार!

Jana Gana Mana Controversy : 'जन गण मन' हे ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी रचलेले गीत; भाजप खासदाराच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ

Latest Marathi News Live Update : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई

Shocking News : मालकिणीचे कामगारावर जडले प्रेम, लग्नानंतर पती पैसे घेऊन फरार; महिलेने पोलिस ठाण्यात उचलले टोकाचे पाऊल

Bribery Action : 'साताऱ्यात लाचप्रकरणी लिपिक जाळ्यात'; शेळी पालनासाठी कर्ज मंजुरीसाठी मागितले पैसे, जिल्ह्यात खळबळ

SCROLL FOR NEXT