neha pendse husband shardul is father of two daughters  
मनोरंजन

नेहा पेंडसेचा पती आहे दोन मुलींचा बाबा !

वृत्तसंस्था

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा आहे ती नेहा पेंडसे आणि तिचा पती शार्दुल बायस यांची. अखेर हे कपल 5 जानेवारीला लग्नबंधनात अडकले आहे. लग्न सोहळ्याच्या सुंदर फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. शार्दुल मराठमोळ्या खास पेहरावामध्ये दिसला आणि नेहा गुलाबी रंगाच्या नऊवारी साडीमध्ये सुंदर दिसत होती. नेहा आणि शार्दुल यांच्या लग्नसोहळ्याला कुटुंबिय आणि जवळचे मित्रमैत्रीण उपस्थित होते. पण, तुम्हाला हे माहित आहे का, नेहाचा पती शार्दुलचा दोन वेळा घटस्फोट झाला आहे. 

बॉलिवूड आणि कलाकारांच्या आयुष्यात लव्ह-अफेअर आणि ब्रेकअप होतात आणि अपयशानंचरही त्यांना अखेर प्रेम मिळतेच. नेहा आणि शार्दुलच्या बाबतीतही असचं काहीसं घडलं आहे. नेहाचा पती शार्दुल बायस याचा याआधी दोन वेळा घटस्फोट झाला आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच नेहा स्पॉटबॉय या साइटशी बोलली. यावेळी तिने दोघांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. 

स्पॉटबॉयने दिलेल्या माहितीनुसार शार्दुलच्या पहिल्या बायकोचं नाव अनीता अग्रवाल असून ती एक बिझनेसवूमन आहे. एवढचं काय शार्दुलला दोन मुलीही आहेत. रिया आणि आलिया असं त्याच्या लेकींची नावं आहेत. शार्दुलचा 2017 मध्ये घटस्फोट झाला. त्यामुळे नेहा त्याची तिसरी पत्नी आहे. 

नेहाने तिच्या पर्सनल लाइफविषयी यावेळी सांगितलं. यापूर्वी नेहा दोन-तीन रिलेशनशिपमध्ये होती पण ते अपयशी ठरले. पण नेहा सांगते या ब्रेकअपमुळेच ती एक खंबीर महिला बनली आहे. पुढे ती म्हणाली, ' शार्दुलला दोन गोंडस मुली आहेत याची मला पूर्ण कल्पना आहे. त्याचं दोन वेळा लग्न झालं आहे हे मला त्याने लग्नाआधीच सांगितलं होतं. त्याने माझ्यापासून कोणतीच गोष्ट लपवली नाही. याआधी त्याचं लग्न झालं या गोष्टीचा मला मात्र फरक पडत नाही'. 

बॉलिवूड चित्रपटांशिवाय नेहाने मराठी आणि तमिळ सिनेमांमधूनही काम केलं आहे. छोट्या पडद्यावरही ती झळकली आहे. ' मे आय कमइन मॅडम' य़ातून ती दिसली. शिवाय सुप्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस' मध्येही ती होती. यातूनच तिला अधिक लोकप्रियतता मिळाली. 

लग्नाविषयी बोलताना नेहा म्हणाली, 'माझ्या स्वप्नातील राजकुमाराशी लग्न करुन मी खूप आनंदी आहे. य निर्णयाने मी अत्यंत खूष आहे. या परिवाराचा हिस्सा होताना मला आनंद होत आहे.' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

German bakery blast: जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपीवर श्रीरामपूरमध्ये गोळीबार; दुचाकीवरुन दोघे आले अन्...

Latest Marathi News Update : छत्रपती संभाजीनगरमधील माजी उप-महापौर लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद

Temple Tour 2026 : नव्या वर्षाच्या सुरुवातीला घ्या 'या' 5 मंदिरांचे दर्शन; मोठे संकट होणार दूर, मिळेल यश अन् बनेल धनलाभ योग

Pimpri Crime : पोलिसांवर गोळीबाराचा प्रयत्न करणाऱ्या सराईत चोरांकडून १२ घरफोडी उघड; २९ लाखांचा मुद्देमाल जप्त!

Railway Recruitment 2026: रेल्वे विभागात नवीन भरती सुरू; अर्ज प्रक्रिया आणि महत्वाची माहिती येथे वाचा

SCROLL FOR NEXT