karan Johar And Bela Bajaria
karan Johar And Bela Bajaria  esakal
मनोरंजन

नेटफ्लिक्सच्या नव्या मालिकांवर टांगती तलवार?: बेला मुंबईत, करणच्या घरी बैठक

युगंधर ताजणे

Web Serise: ऑस्कर विजेता अभिनेता विल स्मिथ (Will Smith) मुंबईत आल्यानंतर त्याच्या पाठोपाठ नेटफ्लिक्सच्या वरिष्ठ अधिकारी बेला बजारिया (Bela Bajaria) यांनी देखील मुंबईची वाट धरली आहे.त्याला कारणही तसेच आहे. नेटफ्लिक्सच्या ज्या मालिका पुढील काही दिवसांत प्रदर्शित होणार आहे त्यावर (Social Media) टांगती तलवार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्या कारणास्तव बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर सोबत मोठ्या (Karan johar) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या बैठकीला बॉलीवूडमधील मोठ्या हस्ती उपस्थित असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून नेटफ्लिक्सवरुन वेगवेगळ्या विषयांच्या दर्जेदार वेबसीरिज प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता परिस्थिती वेगळी असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. नेटफ्लिक्स हा सध्या संकटातून जात असल्याची चर्चा आहे.

शेयर बाजारात देखील नेटफ्लिक्सचे दर हे 35 टक्क्यांनी घटल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे निर्मात्यांनी काळजी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी नेटफ्लिक्सच्या निर्मात्यांनी भारतातील त्यांच्या घटणाऱ्या प्रेक्षकांच्या टक्क्यांबाबत परखडपणे भूमिका मांडली होती. आता त्यावर जोरदारपणे काम सुरु करण्यात आले आहे. मोठमोठ्या संस्था त्याबाबत संशोधन करत आहेत. अखेर कोणत्या गोष्टीमुळे नेटफ्लिक्सचा प्रेक्षकवर्ग कमी झाला याचे कारण शोधले जात आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित आणि विक्रम चंद्रा लिखित सेक्रेड गेम्सनं भारतामध्ये नेटफ्लिक्सला आपलं जाळं पसरता आलं. त्यात या मालिकेचा वाटा मोठा होता. हे सर्वांना ठाऊक आहे. मात्र त्यानंतर नेटफ्लिक्सचा वेग हा काहीसा मंदावलेला दिसतो आहे.

आगामी काळात नेटफ्लिक्सवर मोठमोठे प्रोजेक्ट येणार आहेत. त्यात संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हिरामंडीचे काम अजुन सुरु झालेले नाही. एस एस राजामौली दिग्दर्शित बाहुबली आणि राईज ऑफ शिवगामी ही मालिका अजुन अधांतरीच आहे. रविवारी करण जोहरच्या घरी एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. वास्तविक ही पार्टी करण जोहरनं बेला बजारियासाठी ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. त्या नेटफ्लिक्सच्या मोठ्या अधिकारी आहे. भारतामध्ये येत्या काळात कोणत्या मालिका प्रदर्शित होणार आहेत याचा आढावा आणि इतर प्रोजेक्टसाठी त्या भारतात आल्या आहेत. सध्या त्या कंपनीतून अनेक मोठ्या व्यक्ती बाहेर पडणार असल्याचे सांगण्यात आले असून त्याचा परिणाम नेटफ्लिक्सच्या वतीनं प्रदर्शित होणाऱ्या मालिकांवर होणार असल्याचे बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT