Radhe memes
Radhe memes 
मनोरंजन

'राधे' ठरतोय 'मोस्ट अनवाँटेड भाई'; चित्रपटावर भन्नाट मीम्स व्हायरल

स्वाती वेमूल

सलमान खानचा Salman Khan बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई' Radhe Your Most Wanted Bhai हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित झाला. सलमानच्या चाहत्यांना या चित्रपटाविषयी फार उत्सुकता होती. मात्र चित्रपट पाहिल्यानंतर चाहत्यांची निराशा झाली. प्रभूदेवा दिग्दर्शित सलमानच्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. तर काहींनी हास्यास्पद मीम्स पोस्ट केले. 'राधे' या चित्रपटावरील बरेच मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Netizens React to Salman Khan Radhe Your Most Wanted Bhai with Hilarious Memes)

चित्रपटात काच फोडून सलमानची होणारी एंट्री, मोबाईलवरुन अॅम्ब्युलन्स पाठवण्याचा दिलेला संदेश, डोळ्यांना काच लागल्याने झालेली जखम ...पुन्हा हाच सीन स्लो मोशनमध्ये दाखविण्याचा दिग्दर्शक प्रभुदेवाचा प्रयत्न फारसा यशस्वी झालेला नाही. थिएटरमध्ये या सीनला सलमानच्या चाहत्यांच्या उड्या पडल्या असत्या. टाळ्या आणि शिट्ट्या वाजल्या असत्या. पण ओटीटीवर पाहताना चित्रपटातील दृश्ये ही अतिरंजित वाटतात.

'राधे' हा भारतातील ठराविक आणि परदेशातील काही चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. त्याचसोबत झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रभूदेवाने केलं आहे. यामध्ये सलमान खानसोबतच दिशा पटानी, रणदीप हुडा, गौतम गुलाटी, जॅकी श्रॉफ, सिद्धार्थ जाधव यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT