Nitin Desai esakal
मनोरंजन

Nitin Desai Death : महाराष्ट्रात सरकार कोणाचंही असो, स्टेज मात्र नितीन देसाईच करणार

गेल्या २०-२२ वर्षात जे पण मुख्यमंत्री झालेत त्यांच्या स्टेजची सजावट कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी केली होती.

धनश्री भावसार-बगाडे

CM Stage Decoration By Art Director Nitin Desai :

आज दि. २ ऑगस्ट २०२३ रोजी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याने त्यांचे निधन झाले आहे. ही बातमी केवळ सिनेसृष्टीसाठी नव्हे तर सर्वच कलाप्रेमी रसिकांसाठी अत्यंत धक्कादायक होती.

यानिमित्त नितीन देसाई यांच्या कला कामाचा आढावा घेताना समोर आले की, गेल्या २०-२२ वर्षात जेवढे मुख्यमंत्री झालेत त्यांच्या स्टेजचे डेकोरेशन दरवेळी नितीन देसाई यांनी केले आहे.

दरवेळी त्यांनी तयार केलेल्या स्टेजची काहीतरी खासियत असे. असाच एक गाजलेला मंच म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीचा मंच. या मंचावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेपासून ते त्यांची प्रतिमाही होती.

जेव्हा पहिल्यांना भाजप शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी झाले, त्यावेळीही व्यासपिठाची सजावट नितीन देसाई यांनीच केली होती. २०१४ मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली त्यावेळी पण सजावट देसाईंचीच होती.

नितीन देसाई यांचा प्रवास

नितीन देसाई यांना खरी ओळख 1993 मध्ये आलेल्या विधू विनोद चोप्रा यांच्या '1942 अ लव्ह स्टोरी' चित्रपटाच्या सेट डिझाईनमधून मिळाली. देसाई यांनी 2010 मध्ये 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' या चित्रपटातून उत्तम काम केले. यानंतर 2007 मध्ये आलेल्या 'ट्रॅफिक सिग्नल' या चित्रपटाचा सेटही त्यांनी तयार केला.

2008 मध्ये आलेल्या हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय यांच्या 'जोधा अकबर' या चित्रपटाचा सेटही नितीन देसाई यांनीच तयार केला होता. यासोबतच त्यांनी 'लगान' आणि 'मुन्ना भाई एमबीबीएस' सारख्या चित्रपटांचा सेटही तयार केला होता. याशिवाय देसाई यांनी आतापर्यंत 178 हून अधिक स्टेज तयार केले आहेत.

आतापर्यंत 4 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले-

नितीन देसाई यांना लगान, हम दिल दे चुके सनम आणि लगान यांसारख्या चित्रपटांसाठी पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांना आतापर्यंत 4 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. मुंबईपासून 60 किलोमीटर अंतरावर कर्जत परिसरात त्यांचा स्टुडिओ आहे. कर्जत परिसरात जमीन खरेदी करून त्यांनी स्वत:चा स्टुडिओ बनवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT