nitin gadkari comment on ncp sharad pawar and uddhav thackeray in khupte tithe gupte  SAKAL
मनोरंजन

Sharad Pawar: शरद पवार स्पष्ट कधीच बोलत नाहीत तर उद्धव ठाकरे.. नितीन गडकरींना खुपणारी गोष्ट Nitin Gadkari

अवधुत गुप्तेंनी नितीन गडकरींना खास अंदाजात प्रश्न विचारले. नितीन गडकरींनी सुद्धा त्यांच्या खास शैलीत उत्तरं दिली.

Devendra Jadhav

Nitin Gadkari on Sharad Pawar News: खुपते तिथे गुप्ते या शोचा नवीन सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. आता या शो मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थिती दर्शवणार आहेत.

नेहमीप्रमाणे अवधुत गुप्तेंनी नितीन गडकरींना खास अंदाजात प्रश्न विचारले. नितीन गडकरींनी सुद्धा त्यांच्या खास शैलीत उत्तरं दिली.

(nitin gadkari comment on ncp sharad pawar and uddhav thackeray in khupte tithe gupte)

शोच्या नवीन प्रोमोमध्ये पहायला मिळतं अवधुत गुप्ते एकेक करुन अनेक राजकीय नेत्यांचे फोटो गडकरींना दाखवतो.

या फोटोंमध्ये नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, उद्धव ठाकरे असे अनेक राजकीय नेते सहभागी असतात. या प्रत्येकाबद्दल खुपणारी एक गोष्ट नितीन गडकरींना सांगायची होती.

शोच्या नवीन प्रोमोमध्ये दिसतंय की.. अवधुत गुप्तेने उद्धव ठाकरेंचा फोटो दाखवला.. तेव्हा गडकरी थोडंसं हसत म्हणाले.. उद्धवसाहेब फोनवर फार कमी बोलतात.. मी प्रयत्न करायचो आधी जेव्हा पोहचायला वेळ लागायचा.. पण पोहचायचो मी..

पुढे प्रोमो मध्ये असं दिसतंय की.. नितीन गडकरींना शरद पवारांचा फोटो दाखवण्यात आला. त्यावेळी नितीन गडकरींनी दिलेलं उत्तर सध्याच्या राजकीय परिस्थितीशी समर्पक आहे. नितीन गडकरी म्हणाले... पवार साहेब कधीच स्पष्ट बोलत नाही, ही गोष्ट मला खुपते.

अशाप्रकारे सदाबहार राजकारणी व्यक्तिमत्व नितीन गडकरी खुपते तिथे गुप्ते मध्ये येणार म्हणजे मजा तर येणारच. खुपते तिथे गुप्तेचा हा भाग ९ जुलैला प्रदर्शित येणार आहे.

खुपते तिथे गुप्ते शो चा नवीन सिझन सुरु होतोय. या सीझनमध्ये शुभारंभाच्या एपिसोडमध्ये राज ठाकरे सहभागी झाले होते. अवधूत गुप्तेंनी अनेक गोष्टींच्या बाबतीत राज ठाकरेंना बोलतं केलं आहे.

राज ठाकरेंनी सुद्धा अवधूत गुप्ते यांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली आहेत. ४ जुन पासुन रात्री ९ वाजता खुपते तिथे गुप्ते चा नवीन सीझन भेटीला आलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT