Regional OTT eSakal
मनोरंजन

Regional OTT : मोठ्या ब्रँड्सची पोकळी भरुन काढतायत स्थानिक ओटीटी प्लॅटफॉर्म्स; यावर्षी नॉन-हिंदी कंटेंटवर भर..

Big OTT Platforms : कित्येक मोठे ओटीटी ब्रँड्स हे सध्या केवळ मोठ्या प्रोजेक्ट्सवर लक्ष देत आहेत. अमेझॉन प्राईम हे नवीन प्रोजेक्ट अप्रूव्ह करायला बराच वेळ लावताना दिसत आहे.

Sudesh

Regional OTT Platforms on rise : कोरोना काळानंतर ओटीटी प्लॅटफॉर्म्सची चांगलीच चांदी होताना दिसत आहे. नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, डिज्नी+हॉटस्टार असे कित्येक ओटीटी प्लॅटफॉर्म हे अब्जावधींची कमाई करत आहेत. यातील कित्येक प्लॅटफॉर्म्स सध्या केवळ बिग-बजेट गोष्टींवर लक्ष केंद्रित करत असल्यामुळे स्थानिक लहान ओटीटी प्लॅटफॉर्म्सना देखील फायदा होताना दिसतोय.

मोठ्या ब्रँड्सचे नखरे

कित्येक मोठे ओटीटी ब्रँड्स हे सध्या केवळ मोठ्या प्रोजेक्ट्सवर लक्ष देत आहेत. अमेझॉन प्राईम (Amazon Prime) हे नवीन प्रोजेक्ट अप्रूव्ह करायला बराच वेळ लावताना दिसत आहे. एप्रिल 2022 मध्ये घोषित केलेले सुमारे 40 प्रोजेक्ट अमेझॉनने रद्द केले आहेत. दुसरीकडे नेटफ्लिक्स (Netflix) हे वेब-सीरीजपेक्षा सिनेमांकडे अधिक लक्ष देत आहे. डिज्नी हे रिलायन्ससोबत मर्ज होण्याची चिन्हं दिसत आहेत. तर सोनी आणि झी एकत्र (Sony-Zee Merger) आल्यामुळे ते सध्या केवळ OTT बजेटची पडताळणी करत आहेत.

स्थानिक प्लॅटफॉर्मना संधी

हा सगळा गोंधळ सुरू असताना, ही स्थानिक भाषांमधील ओटीटी प्लॅटफॉर्म्सना चांगली संधी असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. "नवीन कंटेंटची पोकळी भरून काढण्यासाठी नॉन-मेनस्ट्रीम प्लॅटफॉर्म्स आता प्रयत्न करू शकतात. शिवाय, आम्ही स्टार्सच्या मागे तारखांसाठी धावत नाही त्यामुळे कमी वेळेत अधिकाधिक कंटेंट निर्माण करण्याची क्षमता आमच्याकडे आहे." असं मत प्लॅनेट मराठीचे (Planet Marathi) फाउंडर अक्षय बरदापूरकर यांनी मिंटशी बोलताना व्यक्त केलं.

'अल्ट्रा झकास' (Ultra Zakaas) या ओटीटी प्लॅटफॉर्मने देखील मराठीमध्ये जास्तीत जास्त कंटेंट आणण्याचा प्रयत्न करत आहे. याठिकाणी स्टँडअप कॉमेडी, नाटक तसंच हॉलिवूड आणि टॉलिवूडचे सिनेमे मराठीत डब करून दाखवण्यावर देखील हा प्लॅटफॉर्म भर देत आहे. स्थानिक भाषेतील दर्शकांपर्यंत पोहोचण्याची ही एक चांगली संधी असल्याचं अल्ट्रा मीडियाचे डिरेक्टर रजत अग्रवाल यांनी सांगितलं.

बंगाली भाषेतील 'होईचोई' (HoiChoi), तेलुगूमधील 'आहा' (Aha) अशा कित्येक स्थानिक ओटीटी प्लॅटफॉर्म्ससाठी हे वर्ष फायद्याचं ठरणार आहे. 2024 मध्ये जेवढा ओरिजिनल कंटेंट तयार होणार आहे, त्यातील निम्म्याहून अधिक कंटेंट हा नॉन-हिंदी; म्हणजेच व्हर्नाक्युलर भाषांमध्ये असणार आहे. यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल, तसंच नवीन टॅलेंटला व्यासपीठ उपलब्ध होणार आहे असं शेमारू एंटरटेन्मेंटचे सीओओ सौरभ श्रीवास्तव यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT