Nora Fatehi Esakal
मनोरंजन

Nora Fatehi Video: कुणी म्हणालं मच्छर तर कुणी...,एअरपोर्टवरील नोरा फतेहीचा लूक पाहून नेटकऱ्यांंच्या भन्नाट कमेंट्स

नोरा फतेहीचा एअरपोर्टवरील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे. यातील नोराचा लूक तिच्या चाहत्यांना देखील आवडलेला नाही.

प्रणाली मोरे

Nora Fatehi Video: कॅनडाची नोरा फतेही आता हळूहळू बॉलीवूड इंडस्ट्रीत आपलं स्थान पक्कं करताना दिसत आहे. आता नोरानं केवळ डान्सपुरतं स्वतःला स्तिमित ठेवलेलं नाही तर काही सिनेमातनं देखील तिनं चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

डान्स व्यतिरिक्त नोरा काही रिअॅलिटी शोजची परिक्षक देखील राहिली आहे. माहितीसाठी इथं सांगतो की नोरा फतेही 'बिग बॉस ९' मध्ये सहभागी झाली होती. आणि ८३ दिवस तिचा त्यावेळी घरात मुक्काम होता.

नोराने आपल्या बॉलीवूड करिअरची सुरुवात 'रोअर-टायगर ऑफ सुंदरबन' सिनेमातनं केली होती. त्यानंतर तेलुगू सिनेमात आयटम नंबर करताना ती Ittage Recchipodham मध्ये दिसली होती.(Nora Fatehi Airport look troll video viral)

नोरा फतेही एअरपोर्टवर कॅटवुमन लूकमध्ये दिसली. या फोटोंना पाहून काहींनी तिला किम कार्दशियनची स्वस्तातली कॉपी असं म्हणत हिणवलं तर काहींनी वेनमची फिमेल व्हर्जन म्हणून चिडवलं.

काही लोकांनी तर एकदम विचित्र कमेंट केल्या आहेत. कोणीतरी तर चक्कर मच्छर म्हटलंय नोराला. तर कुणी म्हटलंय,हा लूक तिला सूट होत नाहीय.

माहितीसाठी सांगतो की नोराचं नाव कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरसोबत जोडलं गेलं होतं. सुकेशनं नोरावर गंभीर आरोप लावत म्हटलं होतं की ती जॅकलिन फर्नांडिसवर जळते आणि नेहमीच जॅकलिनच्या विरोधात नोरा सुकेशचं ब्रेनवॉश करायची.

हेही वाचा: महिलांनो तरुणपणी घेतलेली जमीन उतारवयात होईल आधार

सुकेशनं हा देखील आरोप नोरावर लावला होता की जॅकलिनला सोडून सुकेशनं नोराला डेट करावं. दिवसांतून दहा-दहा वेळा फोन करायची मला असं देखील सुकेश नोरा विरोधात सांगताना म्हणाला होता.

सुकेशनं असा देखील दावा केला होता की,नोरानं त्याच्याकडून कार घेतली नाही असं जे ती म्हणतेय ते संपूर्णपणे खोटं आहे. कारण तिला गाडी बदलायची होती तेव्हा तिनं हात धुवून सुकेशच्या मागे नव्या गाडीसाठी तगादा लावला होता.

सुकेशनं पुरावे देतो याचे असं म्हणत सांगितलं होतं की त्याचे नोरासोबतचे चॅट्स आणि स्क्रीनशॉट्स ED जवळ आहेत,त्यामुळे मी जे नोरा विरोधात सांगतोय त्यात खोटं काहीच नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT