Nora Fatehi & Akshay Kumar dance Video Viral OO Antava Performance Esakal
मनोरंजन

Viral Video: नोरा-अक्षयच्या 'ऊ अंटावा' पुढं फिके पडले समंथा-अल्लू अर्जुन.. पाहिलंत का गाण्याचं नवं व्हर्जन?

सध्या अक्षय कुमार आणि नोरा फतेही अमेरिकेत एका एंटरटेन्मेंट टूरवर आहेत. या शो मधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

प्रणाली मोरे

Viral Video: बॉलीवूड स्टार अक्षय कुमार सध्या अमेरिकेत 'द एंटरटेनर्स' टूरमुळे भलताच चर्चेत आहे. या टूरचे कितीतरी व्हिडीओज आतापर्यंत समोर आले आहेत. अक्षय सोबत अभिनेत्री नोरा फतेही,सोनम बाजवा,दिशा पटानी आणि मौनी रॉय देखील या टूरमध्ये सामिल झाल्या आहेत.

आता अक्षय आणि नोरा फतेहीचा एक डान्स व्हिडीओ समोर आला आहे..ज्यात दोघांच्या धमाकेदार परफॉर्मन्सवर चाहते फिदा झालेले पहायला मिळत आहे.

व्हिडीओत अक्षय आणि नोरा 'पुष्पा' या सुपरहिट सिनेमातील गाणं 'ऊ अंटावा' वर थिरकताना दिसत आहेत. (Nora Fatehi & Akshay Kumar dance Video Viral OO Antava Performance)

व्हिडीओत अक्षय कुमार नोरा फतेही सोबत जसा नाचतोय ते पाहून आपल्यालाही डान्स करण्याचा मूड झाला तर नवल नव्हे. दोघांमधील केमिस्ट्री सगळ्यांनाच आवडताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये 'पुष्पा' मधील 'ऊ अंटावा' गाण्याचं नवं व्हर्जन पहायला मिळत आहे.

अक्षय आणि नोराचा हा शानदार परफॉर्मन्स थक्क करणारा आहे. यातील नोरा फतेहीच्या लूकविषयी बोलायचं झालं तर तिनं ऑरेंज रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. आणि अक्षयनं प्रिंटेड शर्ट घातला आहे. दोघांचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये अक्षय कुमार नेहमीसारखाच फुल्ल ऑन एनर्जीमध्ये दिसत आहे. तर नोरा देखील एनर्जी आणि डान्समध्ये अक्षयला बरोबरीची टक्कर देताना दिसत आहे. दोघांनी गळ्यात झेंडूच्या फुलांची माळ घातली आहे. नोराच्या लूकला पाहून लोकांना झीनत अमान यांची आठवण येत आहे.

काही लोक मात्र अक्षयला अशापद्धतीनं डान्स करण्यावरनं ट्रोल देखील करताना दिसत आहेत.

हेही वाचा: नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

माहितीसाठी इथं सांगतो की हा व्हायरल झालेला व्हिडीओ अमेरिकेत डलास शहरात 'द एंटरटेनर्स' टूरचं आयोजन केलं होतं तेव्हाचा आहे. या टूरचे कितीतरी व्हिडीओज आतापर्यंत समोर आले आहेत.

नोरा आणि अक्षयचा बेली डान्स करतानाचा व्हिडीओ देखील समोर आला होता, ज्यावर नेटकरी आता प्रतिक्रियांचा वर्षाव करताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG supply India news : आनंदाची बातमी! गॅस टंचाई दूर होणार, स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून २० हजार ४०० मेट्रिक टनाचे एलपीजी मुंबईकडे रवाना

Mumbai News: यूपी-बिहार आणि अन्य शहरातून येणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबईत परवडणारी घरे मिळणार; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Viral Video : विराट कोहलीची 'कॉपी' करायला गेला, बाबर आझम स्वतःच्याच जीवाशी खेळला... थोडक्यात वाचला, सर्व खेळाडू पळत आले...

Chhagan Bhujbal helicopter landing : हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये का उतरावं लागलं छगन भुजबळांनी सविस्तर सांगितलं

Monali Jadhav : जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर मोनालीने पुणे शहर पोलीस दलात कॉन्स्टेबल पद मिळवत कुटुंबाचे स्वप्न केले साकार

SCROLL FOR NEXT