Abhishek Bachchan Nora Fatehi Dance:  Esakal
मनोरंजन

Abhishek Nora Video: बायकोला सोडलं, नोरासोबत अभिषेकचा 'कजरा रे'वर डान्स! व्हिडिओ व्हायरल

Vaishali Patil

18 वर्षांपूर्वी रिलिज झालेल्या 'बंटी और बबली' या चित्रपटाने त्याकाळी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्या चित्रपटाची क्रेझ अजूनही कायम आहे.

या गाण्यातील अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे 'कजरा रे' हे आयकॉनिक गाणं आजही तितकच लोकप्रिय आहे. नुसती धुनही ऐकली तरी ते गाणं लोक गायला सुरवात करतात. आजही

अनेक पार्टी आणि लग्नामध्ये हे गाणं वाजवलं जात. त्याचबरोबर बॉलिवूडच्या अनेक कार्यक्रमातही कलाकर या गाण्यावर नाचतांना दिसतात.

त्यातच आता या अभिषेक बच्चन आणि नोराचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ज्यात ही दोघ कजरा रे'वर जबरदस्त डान्स करतांना दिसत आहे.

नोरा फतेही नुकतिच वांद्रे येथील एका कार्यक्रमात दिसली. यामध्ये बॉलिवूडमधील अनेक स्टार्सनीही सहभाग घेतला होता. या कार्यक्रमासाठी अभिनेत्रीने ब्लॅक सिल्कचा बॅकलेस गाऊन परिधान केला होता. याच कार्यक्रमात इतर बॉलिवूड कलाकारही सहभागी झाले होते.

दरम्यान नोरा फतेहीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये हा व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ मध्यरात्री शूट करण्यात आलेला आहे. या व्हिडिओमध्ये नोरा आणि अभिषेक बच्चन यांच्यासह अनेकजण पार्टीमध्ये मस्त नाचताना दिसत आहेत.

मात्र यात लक्ष वेधलं ते अभिषेक आणि नोराच्या 'कजरा रे' केलेल्या डान्समुळे. व्हिडिओ शेअर करताना नोराने लिहिले की, आता संपलं आहे.

रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात येत आहे की, नोरा फतेही आणि अभिषेक बच्चन दिग्दर्शक रेमो डिसूजा यांच्या पुढील डान्स प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार आहेत. त्याचे शूटिंग संपले आहे त्यामुळे या एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

याबद्दल नुकतचं रेमो डिसूझानेही सांगितले की त्याने त्याचा प्रोजेक्ट पूर्ण केला आहे. तरी अद्याप या प्रकल्पाबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही.

अभिषेक बच्चनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल तर तो सध्या 'द बिग बुल'च्या पुढच्या सीझनच्या तयारीत व्यस्त आहे.

तर नोरा फतेही साजिद खानच्या '100%'मध्ये जॉन अब्राहम, रितेश देशमुख आणि शहनाज गिलसोबत दिसणार आहे.

त्याचबरोबर नोरा कुणाल खेमू दिग्दर्शित 'मडगाव एक्सप्रेस'मध्येही दिसणार आहे. आता नोरा आणि अभिषेक बच्चन यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सूक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Nashik Crime : अघोरी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नाशिकमध्ये भोंदूबाबावर पोक्सोचा गुन्हा

'पहाटेची वेळ आणि बसमध्ये पुरुषांचे घाणेरडे स्पर्श' भारती सिंहने सांगितला भयंकर अनुभव म्हणाली...'त्याने मला घट्ट पकडलं आणि...'

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

Pune News : गणेशोत्सवात गुन्हेगारीला ‘नो एन्ट्री’ ! पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा सराईत गुन्हेगारांना इशारा

SCROLL FOR NEXT