Nora Fatehi trolled  esakal
मनोरंजन

नोरा फतेही नेटिजन्सच्या निशाण्यावर...या वागणुकीने झाली ट्रोल..

नोराचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय.

सकाळ डिजिटल टीम

नोरा फतेहीच्या डान्स मूव्जचे सगळेच दिवाणे आहेत.पण मात्र शोच्या सेटवर जातानाच्या एका व्हिडिओवरून नोराला ट्रोल व्हावं लागलं.नोराचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय.या व्हिडिओमध्ये नोराच्या साडीचा पदर सांभाळत सेक्युरीटी गार्ड दिसतोय.या व्हिडिओला बघून नेटकऱ्यांनी नोराला निशाण्यावर धरलंय.

या व्हिडिओमध्ये गार्ड स्वत: पावसात भिजत होता.आणि नोराच्या साडीचा पदर सांभाळत तिला मदत करत होता.त्या गार्डला व्हिडिओमध्ये बघून नेटकऱ्यांनी त्याच्याविषयी सहानुभूती व्यक्त केली आहे.नोरा फतेही सेटवर जात असतानाचा हा व्हिडिओ आहे.या व्हिडिओमध्ये तिने गुलाबी रंगाची साडी घातली आहे.या साडीचा पदर फार लांब होता.तिचा हा पदर खाली पर्यंत जमिनीला लागत होता.नोरा जेव्हा गाडीने निघाली होती तेव्हा एक व्यक्ती नोरासाठी छत्री घेऊन उभा होता.नोरा गाडीतून खाली उतरताच सेक्यूरिटी गार्डला तिचा पदर पकडताना पाहिलं गेलं.

त्यानंतर नोरा वॅनिटी कारकडे जाताना दिसतेय.आणि गार्ड तिच्या मागे तिचा पदर पकडून वाकून चालताना दिसतोय.नोराचा पदर सांभाळत तिला वॅनिटी कारपर्यंत सोडताना हा गार्ड पावसाने भिजलेला असतो.हा व्हिडिओ बघताच नेटकऱ्यांच्या कमेंटचा वर्षाव झालाय.अनेकांनी हा व्हिडिओ बघून तिला ट्रोल केलंय.

एका नेटकऱ्याने तर,'कपडे स्वत: घालायचे आणि दुसऱ्यांना सांभाळायला लावायचे', अशी भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.तर दुसऱ्याने, 'गार्डला गुलामासारखं वागवते असं म्हटलंय.तर काहींनी गार्डविषयी साहानुभूती व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railways Fare Hike : आता रेल्वेचा प्रवासही महागणार! स्लीपर ते एसी कोचच्या तिकीट दरात मोठी वाढ, जाणून घ्या नवे दर...

Kolhapur Muncipal : नगरपालिका निकालांनी राजकारणाची दिशा बदलली; महायुतीला बळ, काँग्रेसच्या अधःपतनाचे चित्र स्पष्ट

गर्दीत अडकली समांथा प्रभू, निधी अग्रवालनंतर समांथासोबतही धक्काबुक्कीचा प्रकार, Viral Video

Latest Marathi News Live Update : देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील शासकीय निवासस्थानी विजयी उमेदवारांचा सत्कार

Nashik Crime : नाशिकमध्ये गुंडागर्दी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या; यादव आणि म्हस्के टोळीवर 'मकोका'चा बडगा

SCROLL FOR NEXT