Nora Fathehi Airport viral video security Gaurds reaction esakal
मनोरंजन

Viral Video : नोरा आली, सुरक्षारक्षकांची नजर हटेना! 'घरी बायकोनं जर...'

नोरा ही नेहमीच तिच्या हटके लूक आणि स्टाईलसाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. तिच्या नावाला मिळणारं ग्लॅमरही मोठं आहे.

युगंधर ताजणे

Nora Fathehi Airport viral video security Guards reaction : बॉलीवूडची नोरा ही आता देशातील सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रेटी म्हणून प्रसिद्धीस आली आहे. नोराचा तोरा नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो. काही दिवसांपूर्वी परदेश दौऱ्यासाठी गेलेली नोराचे मुंबईत आगमन झाले. त्यानंतर जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्याची जोरदार चर्चा आहे.

नोरा ही नेहमीच तिच्या हटके लूक आणि स्टाईलसाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. तिच्या नावाला मिळणारं ग्लॅमरही मोठं आहे. इंस्टावर नोराचे व्हायरल होणारे फोटो आणि त्याला मिळणारा प्रतिसाद हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. नोराच्या सौंदर्यावर भाळणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्याचा प्रत्यय देणारा तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विमानतळावर कार्यरत असणाऱ्या सुरक्षारक्षकांना देखील नोराला पाहण्याचा मोह काही आवरला नाही. हे त्यातून दिसून आले आहे.

Also Read : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

नोराचा तो फोटो जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर नेटकऱ्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया भलत्याच भन्नाट होत्या. एकानं लिहिलं आहे की, सारा खेळ नजरेचा आहे भाऊ, दुसऱ्यानं लिहिलं आहे, तुमचा हा फोटो जर पत्नीनं पाहिला तर मग काय खरं नाही. नोराच्या त्या फोटोंवरुन चाहते आणि नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे. अनेकांनी त्या सुरक्षारक्षकांच्या एक्सप्रेशनची टिंगल केली आहे. ती सोशल मीडियावर लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

नोराच्या बाबत अधिक माहिती द्यायची झाल्यास ती मुळची कॅनडाची असून भारतामध्ये मॉडेलिंगसाठी आली. आता भारतामध्ये ती खूपच लोकप्रिय झाली आहे. तिचा चाहतावर्ग मोठा आहे. दिलबर दिलबर या गाण्यापासून नोराच्या लोकप्रियतेत वाढ झाली. इंस्टावर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या लाखात आहे. भारतातील लोकप्रिय सेलिब्रेटी म्हणून नोराच्या नावाचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. दिलबर नंतर तिचे ओ साकी नावाचे गाणेही लोकप्रिय झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT