Nusrat Jahan and Yash Dasgupta 
मनोरंजन

"मी कोणतीही चूक केली नाही"; खासदार नुसरत यांचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

आई होणं हा २०२१ मधील सर्वांत धाडसी निर्णय असल्याचं त्यांनी सांगितलं

स्वाती वेमूल

तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ (Nusrat Jahan) नेहमीच त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिल्या. नुकतंच त्यांनी बाळाला जन्म दिला असून मातृत्त्वाबद्दल आणि त्याच्या पित्याबद्दल त्या एका चॅट शोमध्ये मनमोकळेपणाने व्यक्त झाल्या. 'इश्क विथ नुसरत' या चॅट शोमध्ये त्यांनी स्पष्ट केलं की त्या एकट्या नाहीत. "माझा मुलगा यिशान याला इतरांप्रमाणेच सामान्य वडील आणि एक सामान्य आई आहे. मी प्रत्येक निर्णय अत्यंत समजुतदारपणे घेतला आहे," असं त्या म्हणाल्या.

इश्क एफएमने 'युट्यूब'वर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये नुसरत यांना २०२१ मध्ये घेतलेल्या सर्वात धाडसी निर्णयाबाबत एका सोशल मीडिया युजरने प्रश्न विचारला. यावर नुसरत यांनी सांगितलं की मातृत्वाचा प्रवास हा सर्वात धाडसी निर्णय होता. "मी कोणतीही चूक केलेली नाही. हे माझं आयुष्य आहे आणि मी निर्णय घेतला आहे. लोकांना कदाचित तो धाडसी वाटेल पण मला वाटतं की हा निर्णय घेण्यासाठी मी खूप समजूतदार होते. मी याविषयी कधीही बोलले नाही जेणेकरून मला माझ्या निर्णयावर ठाम राहायचं होतं. फक्त मी या विषयावर बोलले नाही म्हणून, बर्‍याच लोकांनी माझ्यावर टीका केली. म्हणून आज मी याबद्दल बोलत आहे. होय, मी अत्यंत धैर्यवान आहे आणि मला माझ्या आई होण्याच्या निर्णयाचा खूप अभिमान आहे. मी एकटी आई नाही, माझ्या मुलाचे एक सामान्य वडील आणि माझ्यासारखी सामान्य आई आहे", असं त्या म्हणाल्या.

या चॅट शोमध्ये त्यांनी गरोदरपणात होणाऱ्या हार्मोनल चेजेंसबद्दलही सांगितलं. "घरातील एखादं रोपटं जरी सुकलं तरी मी रडायची. शरीरातील हार्मोनल बदलांमुळे मी विनाकारण रडायची आणि हसायची. कधी कधी मला पहाटे 3 वाजता केळी खायची इच्छा व्हायची. विशेष म्हणजे हे फळ मी आयुष्यात कधीही खाल्लं नव्हतं," असं त्या म्हणाल्या. काही दिवसांपूर्वी नुसरत यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता. त्या फोटोवर अनेकांनी कमेंट करत नुसरत यांनी नाकाची सर्जरी केली का असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरही त्यांनी नाकाची सर्जरी केली नसल्याचं स्पष्ट केलं.

नुसरत यांनी ऑगस्टमध्ये यिशानला जन्म दिला. अभिनेता यश दासगुप्ता हा यिशानचा पिता असल्याचं त्यांनी सांगितलं. २०१९ मध्ये त्यांनी तुर्कीमध्ये निखिल जैनशी लग्न केलं होतं. या वर्षी जूनमध्ये त्यांनी भारतीय कायद्यानुसार त्यांचं लग्न अवैध असल्याचं सांगितलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Flood Alert: पुण्यात अलर्ट! खडकवासला धरणातून मोठा विसर्ग; बाबा भिडे पूल पाण्याखाली, रस्ता बंद, युवकाची अग्निशामक दलाकडून सुटका

Nanded Water: नांदेडकरांसाठी दिलासादायक बातमी! विष्णुपुरी धरणाच्या पाणीसाठ्यात एका दिवसात 9 टक्क्यांची वाढ, धरणांना जीवदान

Latest Marathi News Live Update : शनिवार आणि रविवारी किल्ले सिंहगड राहणार बंद

Commonwealth Games 2026: सायकल दुरूस्तीचे काम करणाऱ्या बापाच्या लेकीने इतिहास घडवला... ज्युदोत पक्कं केलं पदक, कोण आहे अस्मिता डे?

'कॉकरोच जनता पार्टी'ची पाकिस्तानात क्रेझ! पाकमध्येही 'कॉकरोच पार्टी', देशाच्या गृहमंत्र्यानेच सरकारला दिला 'हा' इशारा

SCROLL FOR NEXT