OMG 2 song Oonchi Oonchi Waadi Akshay Kumar is God in disguise for a worried father Pankaj Tripathi  SAKAL
मनोरंजन

Oonchi Oonchi Waadi: भाबडा भक्त अन् भोळा शंकर, OMG 2 मधलं पहिलं गाणं भेटीला

OMG 2 मधलं ऊॅंची ऊॅंची वादीया असं या गाण्याचं नाव असुन या गाण्यात भाबडा भक्त आणि भोळा शंकर यांच्यातलं नातं दिसुन येतंय

Devendra Jadhav

Oonchi Oonchi Waadi Song OMG 2 News: सध्या सगळीकडे OMG 2 सिनेमाची चर्चा आहे. अक्षय कुमार या सिनेमात भगवान शंकराची भुमिका साकारत आहे. अक्षय कुमारचा लुक, सिनेमाचा विषय अशा अनेक गोष्टींची सध्या चर्चा आहे.

अशातच सिनेमातलं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. ऊॅंची ऊॅंची वादीया असं या गाण्याचं नाव असुन या गाण्यात भाबडा भक्त आणि भोळा शंकर यांच्यातलं नातं दिसुन येतंय

(OMG 2 song Oonchi Oonchi Waadi Akshay Kumar is God in disguise for a worried father Pankaj Tripathi)

ऊॅंची ऊॅंची वादीया गाण्यात काय?

OMG 2 च्या ऊॅंची ऊॅंची वादीया गाण्यात दिसतं की, पंकज त्रिपाठी त्यांच्या कुटूंबासोबत मजेत जगत असतात. पुजेचं सामान विकत, भजन हात पंकज सामान्य माणसाच्या भुमिकेत दिसत आहेत.

पुढे पंकज यांच्या कुटूंबावर काहीतरी संकट ओढवतं आणि मग भगवान शंकर त्यांच्या मदतीसाठी प्रकट होतात. पुढे शंकराच्या भुमिकेत अक्षय कुमार त्या कुटूंबाची साथ अन् त्यांना आधार देताना दिसतो.

OMG 2 सिनेमा रखडला?

OMG 2 या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सेन्सॉर बोर्डाने त्यावर आक्षेप घेतल्याचे कळतंय. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांना CBFC सोबत अडचणी येत आहेत.

निर्मात्यांना हा सिनेमा Review समितीकडे नेण्यास सांगितला आहे. तथापि, 'OMG 2' च्या निर्मात्यांना अद्याप CBFC कडून कोणतीही सूचना मिळालेली नाही.

OMG 2 सुपरहिट होणार?

OMG 2 या चित्रपटाच्या टिझर नंतरच वाद सुरू झाला आहे. सेन्सॉर बोर्डाने देखील हा चित्रपट रिव्ह्यूसाठी पाठवला आहे. कारण, आदिपुरुषप्रमाणेच OMG 2 मुळे देखील लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात असा आरोप करण्यात आला आहे.

चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर काही दृश्यांना देखील नेटकऱ्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे अक्षयला या चित्रपटाबाबत कोणतीही जोखिम घ्यायची नसल्याचं बोललं जात आहे.

त्यामुळे आता OMG2 हा चित्रपट अक्षयच्या फ्लॉप चित्रपटांवर फुलस्टॉप लावेल का याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Politics : नेत्यांची लागणार कसोटी! विधानसभा-लोकसभेत दिलेला 'तो' शब्द पाळण्याचे मोठे आव्हान, कार्यकर्त्यांचा 'पैरा' फेडावा लागणार

Zudio Sale : दिवाळीनिमित्त Zudio मध्ये लागलाय खास सेल; खरेदीवर 70% ते 90% पर्यंत डिस्काउंट, सर्व ऑफर्स पाहा एका क्लिकवर..

Latest Marathi News Live Update : जीआरनंतर मराठवाड्यात कुणबीचे केवळ २७ प्रमाणपत्र- तायवाडे

Viral Video: 'मी तुम्हाला बोलावलंच नाहीये...' जेव्हा जसप्रीत बुमराहची सटकते; विमानतळाबाहेर रिपोर्टर्सवर भडकला

Pune : लालपरीची काय ही अवस्था? दरवाजाच नाही, तरी प्रवाशांच्या सेवेत; जीव धोक्यात घालून प्रवास

SCROLL FOR NEXT