on prabhas birthday director om raut shared a new poster of adipurush movie with tile prabhu shree ram  sakal
मनोरंजन

Adipurush: राजा राम प्रगटला.. म्हणत ओम राऊतने शेयर केलं पोस्टर, प्रभासला पाहून..

दिवाळीच्या निमित्ताने दिग्दर्शक ओम राऊतने शेयर केलं 'आदिपुरुष' चित्रपटाचं नवं पोस्टर..

नीलेश अडसूळ

Adipurush director om raut: 'तान्हाजी' चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) हा सध्या त्याच्या 'आदिपुरुष' (Adipurush) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची सर्वजन आतुरतेने वाट पाहत होते. परंतु या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आणि एका वेगळ्याच वादाला तोंड फुटले. चित्रपटात वापरण्यात आलेले VFX आणि रावणाची भूमिका यावरून या चित्रपटाला खूप ट्रोल केलं गेलं. पण आज ओम राऊत यांनी आज पुन्हा एकदा 'आदिपुरुष' चित्रपटाचे नवे आणि खास पोस्टर शेयर केले आहे. त्याचे निमित्तही तसेच आहे. या चित्रपटात 'राम' साकारणाऱ्या अभिनेता प्रभासचा आज वाढदिवस आहे. त्या निमित्ताने ही खास पोस्टर शेयर करत ओं राऊतने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

(on prabhas birthday director om raut shared a new poster of adipurush movie with tile prabhu shree ram )

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या (prabhas ) वाढदिवसाचं औचित्य साधत ओम राऊत (om raut)यांनी त्यांच्या सोशल मीडियावर दमदार संदेश देत चित्रपटाचं नवं पोस्टर शेअर केलं आहे. हे पोस्टर शेअर करत ओम राऊत यांनी लिहिले, "मिळवूनी वानरसेना राजा राम प्रगटला. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम.. या पोस्टरमध्ये प्रभासनं मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामांच्या भूमिकेत दिसत आहे.

(happy birthday prabhas)

प्रभासबाबत बोलताना सिनेमाचे दिग्दर्शक ओम राऊत म्हणाले, ''प्रभास हा आपल्या भूमिकेसाठी अत्यंत मेहनत घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. हे पोस्टर त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे.''

ओम राऊत यांचा पहिला मराठी सिनेमा ‘लोकमान्य एक युगपुरुष’ हा रूपेरी पडद्यावर गाजला. पहिल्यावहिल्या सिनेमातल्या दिग्दर्शनानं ओम राऊत यांनी साऱ्यांची मनं जिंकली. त्यानंतर त्यांच्या 'तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला. प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमान असलेल्या ओम राऊत यांच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्र ताकदीनं उभा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आपला जस्सी... त्यांचा जोफ्रा! Lord's वर भारत-इंग्लंड सामन्यात दिसणार वेगाची शर्यत; BCCI vs ECB आतापासूनच भिडले

Bombay Stock Exchange Journey: वडाच्या झाडाखाली सुरूवात अन्...; भारताचा शेअर बाजार आशियाचा 'आर्थिक वाघ' कसा बनला?

Thane News: पुलावर वाहतूक कोंडी कायम, प्रवासी हैराण; वाहतूक पोलिसांचा नवा प्लॅन

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

SCROLL FOR NEXT