Prajakta Mali, Prajakta Mali news, Prajakta Mali big announcement, Prajakta Mali hot photos, Prajakta Mali bold photos, maharashtrachi hasyajatra SAKAL
मनोरंजन

Prajakta Mali: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प्राजक्ताने 'लग्नाळुंसाठी' केली ही मोठी घोषणा

प्राजक्ताचं सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग आहे

Devendra Jadhav

Prajakta Mali News: महाराष्ट्राची हास्यजत्रा या रिऍलिटी शोची निवेदिका प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असते. प्राजक्ताचं सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग आहे.

प्राजक्ता हास्यजत्रेची निवेदिका नाही तर अनेक माध्यमांमधून फॅन्सच्या सतत संपर्कात असते.

आज असलेल्या अक्षय्य तृतीयेनिमित्त प्राजक्ताने सोशल मीडियावर एक महत्वाची घोषणा केलीय. ही घोषणा ऐकून लग्नासाठी उत्सुक असलेल्या अनेकांना आनंद होईल.

(On the occasion of Akshaya Tritiya, marathi actress Prajakta mali made a big announcement for 'Weddings season)

हेही वाचा: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक. प्राजक्ता लग्नाच्या खरेदीसाठी खास लग्नसराई संच घेऊन आलीय.

प्राजक्ताने आज सोशल मीडियावर लाईव्ह येऊन हा खुलासा केलाय. या संचात नेमके कोणते दागिने असणार हे तुम्हाला प्राजक्तराज च्या वेबसाईट वर जाऊन कळेल.

प्राजक्ताने प्राजक्तराजच्या माध्यमातून आजवर अनेक नवनवीन आणि अस्सल मराठमोळे दागिने सर्वांच्या भेटीला आणले आहेत. याच माध्यमातून प्राजक्ताने आता लग्नसराइ संच आणला आहे.

प्राजक्ताला लग्नसराई संचाची कल्पना महाराष्ट्राची हास्यजत्राचे लेखक - दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी सांगितली होती. प्राजक्ताने काहीच दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर केलाय.

यात प्राजक्तासोबत महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेते - दिग्दर्शक सचिन गोस्वामी होते. प्राजक्ता सचिन गोस्वामींना तिच्या दागिन्यांचं दाखवत असते.

सचिन गोस्वामी सुद्धा कुतूहलाने प्राजक्तराजचे दागिने बघत असतात. प्राजक्ता तू आदर्श आहेस.. हे दागिने मराठी परंपरेतून हरवत चालले होते.

अशा अलंकरांना तू सर्वांसमोर आणलं आहेस.. अशा शब्दात गोस्वामींनी प्राजक्ताचं कौतुक केलं.

पुढे सचिन गोस्वामी सरांनी एक कल्पना सुचवली की असा एकत्रित दागिन्यांचा बॅाक्सच का नाही आणत? जेणेकरून लोकांना भेट म्हणून द्यायला; स्वतःलाही वापरायला संपूर्ण सेट राहील.."

गोस्वामींनी सुचवलेला सल्ला लक्षात घेत प्राजक्ताने अक्षय्य तृतीयेच्या मूहूर्तावर प्राजक्तराजचं नवीन कलेक्शन समोर आणलं आहे.

प्राजक्ताच्या आजवरच्या अनेक नवनवीन कल्पनांना तिच्या चाहत्यांनी पाठिंबा दिला. प्राजक्ताच्या लग्नसराई संचाला सुद्धा तिचे चाहते सपोर्ट करतील अशी तिला आशा आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Pakistan Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान आशिया कप लढत! रेकॉर्ड्स, स्टॅट्स आणि संभाव्य विजेता कोण?

मोठी बातमी! विभक्त रेशनकार्डधारक सूना ‘लाडकी बहीण’साठी पात्र; पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, पण ४ लाखांवर लाभार्थी पत्त्यावर सापडल्याच नाहीत

आजचे राशिभविष्य - 14 सप्टेंबर 2025

साप्ताहिक राशिभविष्य : (१४ सप्टेंबर २०२५ ते १९ सप्टेंबर २०२५)

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT