Oppenheimer Review Christopher Nolan Movie Released esakal
मनोरंजन

Oppenheimer Review : अमेरिका जशी डोक्यावर घेते तशीच ती...! 'ओपनहायमर'ला बोटावर नाचवलं

Oppenheimer Movie Review: ओपनहायमरला ही गोष्ट एव्हाना उशिरानं कळली. तो पर्यत खूपच उशीर झाला होता. त्याच्या हातून बऱ्याच चूकाही झाल्या होत्या.

युगंधर ताजणे

Oppenheimer Review Christopher Nolan Movie Released : ख्रिस्तोफर नोलानचा चित्रपट पाहायचा म्हणजे तुमच्याकडे संयम पाहिजे. बाकीच्या टिपिकल बॉलीवूड किंवा हॉलीवूड चित्रपटासारखा अतिरंजितपणा, थरार, क्राईम, सेक्स असे काही त्या चित्रपटांमध्ये नसते.

आपल्या आगळ्या वेगळ्या स्टोरीटेलिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या नोलानच्या आतापर्यतच्या कलाकृतींना चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. जगभरामध्ये आज नोलानचा ओपनहायमर चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याचे कौतूक होताना दिसते आहे.

जे रॉबर्ट ओपनहायमर हा जगप्रसिद्ध झाला त्याचे कारण त्यानं अणुबॉम्बचा लावलेला शोध. मात्र त्या शोधाचे पुढे काय होणार, त्याचे परिणाम काय असणार याविषयी त्यानं ज्या गांभीर्यानं विचार करायला हवा होता तो केला होता का, मानवी जीवन पूर्णपणे उद्धवस्त करु पाहणाऱ्या या बॉम्बविषयी ओपनहायमरची काय भूमिका होती, त्याला अमेरिकनं स्वताच्या फायद्यासाठी त्याचा उपयोग तर नाही ना केला, जगाच्या पाठीवर ओपनहायमर विषयी कशाप्रकारच्या प्रतिक्रिया होत्या, त्याची विचारधारा, त्यावर झालेले अतिक्रमण, यासारख्या वेगवेगळ्या मुदयांवर नोलानचा ओपनहायमर बोलतो.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

जागतिक महायुद्ध पहिले, दुसरे, जर्मनी, ब्रिटन, सोव्हिएत रशिया, जपान आणि अमेरिका यांच्यातील तणावाचे संबंध, एकमेकांवर होणाऱ्या कुरघोड्या, स्वार्थाचे गलिच्छ राजकारण, जागतिक हितसंबंध, सत्तेसाठी हपापलेले प्रबळ देश यासगळ्यात विचारवंत, शास्त्रज्ञ, वेगवेगळ्या विषयांतील अभ्यासक, तज्ज्ञ यांना आपल्या तालावर नाचवण्यात काही देश धन्यता मानत आले आहेत.

अमेरिका त्यापैकी एक. नोलानचा हा चित्रपट पाहताना अमेरिका आणि अमेरिकेचे जागतिक पटलावरील राजकारण आपल्याला समजून घेता येते.

सगळं काही करायचं आणि गळ्यापर्यत आल्यावर नाही म्हणायचं ही अमेरिकेची जूनी खोड, जिथं आपलं नाव होईल, चमकता येईल तिथे चमकूनही घ्यायचं, पण एखादी गोष्ट विनाकारण आपल्या नावावर खपवली जातेय, त्या गोष्टीसाठी आम्ही जबाबदार नाही, असे सांगण्यात अमेरिका नेहमीच अग्रेसर राहिली आहे.

ओपनहायमरला ही गोष्ट एव्हाना उशिरानं कळली. तो पर्यत खूपच उशीर झाला होता. त्याच्या हातून बऱ्याच चूकाही झाल्या होत्या. हे सगळं बारकाईनं जाणून घेण्यासाठी नोलानचा ओपनहायमर पाहावा लागतो.

ओपनहायमर आणि आईन्स्टाईन हे त्याकाळातील महान शास्त्रज्ञ. आईन्स्टाईनविषयी तर नेहमीच संवेदनशील आणि आदरानं बोललं जातं. त्यांचं काम, सामाजिक जाणीव, आणि माणूसकी यामुळे आईन्स्टाईनं यांचे नाव घेतले जाते. चित्रपटामध्ये ओपनहायमर आणि आईन्स्टाईन यांची भेट होते.

खरं तर दोनवेळा झालेली भेट ओपनहायमरविषयी खूप काही सांगून जाते. नोलाननं या भेटीचं चित्रण ज्याप्रकारे पडद्यावर मांडला आहे तो प्रभावी आहे. त्यातून आपल्याला त्यावेळचे जागतिक इतिहासातील संदर्भ, त्याचे होणारे दुरगामी परिणाम याविषयी कळून येते. नोलान ओपनहायमरच्या प्रत्येक फ्रेम्समधून खूप काही सांगू पाहतो.

जवळपास ३ तासांच्या या चित्रपटात नोलानं आपल्याला ज्या तऱ्हेनं प्रभावित करतो ते कमाल आहे. मुळातच नोलानची स्टोरीटेलिंगची पद्धत, त्याचं कॅमेऱायझेशन, संगीताचा प्रभावी वापर, प्रतिमा, रुपकं यांचा उपयोग आणि त्यातून आपल्याला प्रेक्षकांना जे सांगायचे ते तो नेमक्यापणानं सांगतो. पण त्यातून काय बोध घ्यायचा तो प्रेक्षकांनी घ्यावा. तो प्रेक्षकांवर कोणतीही गोष्ट लादत नाही. ते त्याला पसंतही नाही. त्याच्या यापूर्वीच्या चित्रपटांकडे पाहिल्यावर ती गोष्ट पाहिल्यावर जाणवते.

ओपनहायमर महान अणुबॉम्ब शास्त्रज्ञ तर होताच पण यापलीकडे तो माणूस म्हणून, मित्र म्हणून कसा होता, त्याचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता हे नोलान वेगवेगळ्या ऐतिहासिक घडामोडींचा संदर्भ घेत, पुरावे सांगत, प्रसंगी चित्रपटाचा टोन ब्लॅक अँड व्हाईट करत खरं खोटं पटवून देण्याचा प्रयत्न नोलाननं केला आहे. आईनस्टाईन आणि ओपनहायमरची दुसरी भेट नोलान दाखवतो, त्यावेळी त्यांच्यात नेमकी कशावरुन चर्चा झाली हे तो काही सांगत नाही.

Nolan Movie

योग्य ती वेळ आल्यावर नोलाननं ओपनहायमर आणि आईन्स्टाईन यांच्यात काय बोलणे झाले होते हे सांगत वेगळाच प्रश्न प्रेक्षकांसमोर ठेवला आहे. दुसरीकडे दोन घटनांमधील दोनवेळचा तो अपमान स्ट्रॉस विसरलेला नाही. म्हणून तर अनेक गोष्टी घडवून आणल्या तर नाही ना, असाही प्रश्न नोलानं प्रेक्षकांच्या डोक्यात सोडून जातो.

ओपनहायमरमध्ये काही गोष्टी आवर्जून पाहाव्यात असे सांगावे लागेल. ते म्हणजे कलाकारांचा अभिनय, ओपनहायमरची भूमिका करणारा सिलियन मर्फी, स्ट्रॉसची भूमिका करणारा रॉबर्ट डाऊनी, ओपनहायरच्या पत्नीची भूमिका करणारी एमिली ब्लंट यांच्या भूमिका कमाल आहेत.

त्याच्या जोडीला नोलानच्या या चित्रपटातील छायाचित्रण, ग्राफिक्स प्रभावी आहेत. संवाद उस्फुर्त आहेत. संगीत चित्तवेधक आहे. यासगळ्यामुळे ओपनहायमर मोठी ट्रीट म्हणावी अशी कलाकृती आहे. असे म्हणावे लागेल.

चित्रपटाचे नाव - ओपनहायमर

दिग्दर्शक - ख्रिस्तोफर नोलान

कलाकार - सिलियन मर्फी, रॉबर्ट डाऊनी (ज्युनिअर), फ्लॉरेन्स प्लग, एमिली ब्लंट, मॅट डेमॉन

रेटिंग - ****

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT