Cillian Murphy Reaction News
Cillian Murphy Reaction News esakal
मनोरंजन

Cillian Murphy Reaction : 'गर्व आहे मी आयरिश असल्याचा....' सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यानंतर सिलियन काय म्हणाला?

युगंधर ताजणे

Cillian Murphy Wins Best Actor Oscar: प्रसिद्ध दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनच्या ओपनहायमरनं आपल्या नावाचा वेगळा इतिहास घडवल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची चर्चा होती. १३ नामांकनामधून या चित्रपटानं ७ पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. नोलनच्या ओपनहायमरची सर्वात मोठी क्रेझ यंदाच्या ऑस्करवर दिसून आली. ९६ वा ऑस्कर सोहळा ओपनहायमरमुळे वेगळ्याच उंचीवर गेला.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार स्विकारल्यानंतर सिलियन मर्फीची प्रतिक्रिया ही चर्चेत आली आहे. त्यानं आपले मत ठामपणे ऑस्कर सारख्या मोठ्या मंचावरुन मांडले असून त्याकडे चाहते, नेटकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. त्यानं त्याला मिळालेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हा जगभरात शांतता नांदावी यासाठी झटणाऱ्या व्यक्तिमत्वांना अर्पण केल्याचे दिसून आले आहे. याशिवाय त्यानं नोलन आणि इमा थॉमस यांचेही खास आभार मानले आहेत.

मर्फी म्हणाला की, माझ्याबाबत आज जे काही घडत आहे त्याबद्दल मी नोलन आणि सहकाऱ्यांचा आभारी आहे. गेल्या वीस वर्षांपासून या प्रवासाचा सोबती आहे. त्यातून खूप काही शिकायला मिळाले. मी माझा हा पुरस्कार जगभरातील पीसमेकर्सला अर्पण करतो. ज्यांनी जगात शांतता नांदावी म्हणून नेहमची प्रयत्न केला.

माझ्यावर अॅकडमीनं जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचेही आभार. ओपनहायमरमधील प्रत्येक जण, तो चित्रपट व्हावा यासाठी झटणाऱ्या सगळ्यांचा मी आभारी आहे. याशिवाय माझ्यासह ज्या अनेकांना नॉमिनेशन मिळालं होतं. त्यांचाही मी ऋणी आहे. एका क्रिएटिव्ह टीमसोबत काम करता आले याचाही आनंद आहे. मला गर्व आहे की मी आयरिश आहे. अशा शब्दांत सिलियननं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ज्यानं अणुबॉम्ब तयार केला त्याच्या आयुष्यावर आम्ही चित्रपट निर्मिती केली. त्यानं जे केलं ते चांगलं होतं की वाईट यावर चित्रपटामध्ये चर्चा करण्यात आली होती. आम्ही सर्वांनी या चित्रपटाच्या निमित्तानं ओपनहायमर जगला आहे. त्यासाठी प्रचंड मेहनतही घेतली आहे. त्यामुळे हा पुरस्कार मी जगभरातील शांततावादी लोकांना, शांततेचा पुरस्कार करणाऱ्यांना अर्पण करतो. असेही सिलियननं म्हटले आहे.

ऑस्करचा सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार जिंकण्यापूर्वी सिलियननं बाफ्ता पुरस्कार, गोल्डन ग्लोब आणि स्क्रिन अॅक्टर्स गिल्ड पुरस्कारावरही आपल्या नावाची मोहोर उमटवली होती. सिलियनला स्पर्धा होती ती पॉल गियामट्टी, ब्रॅडली कूपर, कोलमन डॉमिंगो आणि जेफ्री राईट्स नावाच्या अभिनेत्यांसोबत स्पर्धा होती.

नोलानच्या ओपनहायमला यंदाच्या ऑस्करमध्ये एकुण १३ नॉमिनेशन्स होते. त्यापैकी त्यानं ७ पुरस्कारांवर आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे. त्यात बेस्ट फिल्म, डिरेक्टर, एडिटिंग, म्युझिक, सपोर्टिंग अॅक्टर, सिनेमॅटोग्राफी आणि बेस्ट अॅक्टरच्या पुरस्कारानं गौरविण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

ICMR On Side Effects Of Covaxin: Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट; ICMR ने अहवालावर उपस्थित प्रश्न केले

SCROLL FOR NEXT