Oscar Academy esakal
मनोरंजन

Oscar Academy ': आमचे मेंबर होता का'? ऑस्करच्या कमिटीनं रामचरण, एनटीआरला पाठवलं खास निमंत्रण

अॅकडमी ऑफ मोशन पिक्चर्स अँड सायन्स कमिटीनं जवळपास ३९८ जणांना निमंत्रण पाठवले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Oscar Academy Members Ram Charan Jr NTR Karan : एस एस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला ऑस्कर मिळालं आणि भारताची मान पुन्हा एकदा अभिमानानं उंचावली. बऱ्याच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारताला ऑस्कर मिळाला. अशातच भारताच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्या बातमीनं तमाम भारतीय चाहत्यांना मोठा आनंद झाला आहे.

अॅकडमी ऑफ मोशन पिक्चर्स अँड सायन्स कमिटीनं जवळपास ३९८ जणांना निमंत्रण पाठवले आहेत. त्यात भारतातील काही जणांचा समावेश करण्यात आला आहे. भारतासाठी ही एक गौरवाची बाब आहे. त्या टीममध्ये करण जोहर, रामचरण, ज्युनियर एनटीआर, एम किरावनी, सेंथिल कुमार आणि चंद्रबोस यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या बातमीमुळे अनेकांनी आरआरआरच्या टीमवर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

Also Read - Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

जगभरामध्ये ऑस्कर पुरस्काराची वेगळीच ओळख आहे. त्याचा दबदबाही मोठा आहे. एखाद्या कलाकृतीला जेव्हा ऑस्कर मिळतो तेव्हा त्या कलाकृतीविषयी जगभर चर्चा होताना दिसते. फिल्ममेकर मणिरत्नमआणि एम एम किरवानी यांना देखील कमिटीनं मेंबर होण्यासाठी निमंत्रण पाठवले आहे. जगभरातील ज्या ३९८ दिग्गजांचा समावेश करण्यात आला आहे त्यामध्ये टेलर स्विफ्ट, के.हुई क्वान यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय कलाकारांचा त्यात समावेश करण्यात आला आहे.

ज्यांचा ऑस्करच्या कमिटी मेंबरमध्ये समावेश करण्यात येतो त्यात त्या सदस्याचे काम पाहिले जाते. त्यानं तयार केलेली कलाकृती, त्याचे कलेसाठी योगदान, त्याची कलेप्रतीची समज केवळ चित्रपटच नाही तर संगीत क्षेत्रातही योगदान देणाऱ्या मेंबर्समध्ये अशा व्यक्तींचा समावेश करुन घेतला जातो. याविषयी अॅकडमीचे सीईओ बिल क्रेमर आणि अध्यक्ष जेनेट यांग यांनी माहिती दिली आहे.

आम्हाला अॅकडमी कमिटीच्या वतीनं संवाद साधायला मिळतो आहे ही मोठी गोष्ट आहे. त्यांच्यातील टॅलेंटविषयी आपल्याला यानिमित्तानं संधी मिळते ही देखील आवर्जून उल्लेख करावा अशी बाब आहे. मोशन पिक्चर्स अॅकडमीनं कला आणि विज्ञानाच्या क्षेत्रात मोठी कामगिरी करणाऱ्यांवर खूप प्रभाव टाकला आहे. असेही अॅकडमीच्या अध्यक्षांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Birth Tourism: गर्भधारणेदरम्यान अमेरिकेत प्रवास करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! यूएस दूतावासाकडून व्हिसा रद्द करण्याचा इशारा, कारण काय?

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात १९ तारखेला दोषारोप निश्चिती? सुनावणीत नेमकं काय घडलं?

Pune News : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात ३ हजार कोटींचा विकासधडाका; सोमवारी मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम!

Latest Marathi News Live Update : छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालयामध्ये ऐतिहासिक वस्तूंची माहिती देणारं प्रदर्शन

Pune Traffic Update : शिवणे- नांदेड पूल रस्ता शनिवारी रात्री वाहतुकीसाठी बंद; महावितरणची भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम!

SCROLL FOR NEXT