Kangana Ranaut Support Will Smith  
मनोरंजन

विल स्मिथ थप्पड प्रकरणात कंगनाची उडी; म्हणाली, 'मी असते तर...'

सकाळ डिजिटल टीम

काल ऑस्करच्या (Oscars Awards 2022) 94 व्या अकादमी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यामध्ये हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विल स्मिथला (Will Smith) ऑस्कर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. मात्र, हा सोहळा गाजला आहे तो वेगळ्याच कारणांनी... या सोहळ्याचे निवेदन करणारा कॉमेडियन ख्रिस रॉक याला अभिनेता विल स्मिथने (Will Smith) मंचावर जाऊन थप्पड मारली होती. काल दिवसभरात याच घटनेवर अधिक चर्चा झाली असून आजही तिच्यावर प्रतिक्रिया येत आहेत. विल स्मिथने ख्रिस रॉकची माफी मागणारी पोस्ट टाकली असली तरी कंगनाने आता यावर आपलं मत मांडत विलला पाठिंबा दिला आहे. (Kangana Ranaut Support Will Smith)

काय म्हणाली कंगना?

यासंदर्भात आता कंगना रणौत हिने आपलं मत मांडलं आहे. तिने इन्स्टाग्रामवर विल स्मिथ आणि क्रिस रॉक यांचा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'जर एखादा मूर्ख माणूस लोकांना हसवण्यासाठी माझ्या आई किंवा बहिणीबद्दल अशी चेष्टा करत असेल तर मी देखील तेच करेन जे स्मिथनं केलंय. '

'किंग रिचर्ड्स' चित्रपटासाठी विल स्मिथला ऑस्कर मिळाला आहे. मात्र, या थप्पडीचा ख्रिस रॉकला (Chris Rock) फायदाच झाला असल्याचं दिसून येतंय कारण, त्याचा आगामी कॉमेडी शो सध्या तुफान हाऊसफुल्ल झाला आहे. त्याच्या आगामी स्टँड-अप शोसाठीच्या तिकीट विक्रीमध्ये विक्रमी वाढ होत आहे.

काल सोहळ्यात नेमकं काय घडलं?

विल स्मिथला यावर्षी ‘किंग रिचर्ड’साठी नामांकन मिळाले होते. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. क्रिस रॉक सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार सादर करण्यासाठी मंचावर आला होता. त्यावेळी त्याने विल स्मिथच्या पत्नीवर एक विनोद केला. त्यानंतर विल स्मिथने स्टेजवर जाऊन त्याला कानाखाली मारल्याचं दिसून आलं. कॉमेडियन क्रिसने विल स्मिथची पत्नी जॅडाच्या आजारपणाची खिल्ली उडवली होती, जी त्याला आवडली नाही. मात्र, त्यानंतर विल स्मिथने घडल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

'ही' मुस्लिम अभिनेत्री मन:शांतीसाठी वाचते हनुमान चालिसा, म्हणाली, 'मला गायत्री मंत्र खूप आवडतो, त्याने ऊर्जा जाणवते'

"माजोरडी उत्तरं..." हिंदी भाषा सक्तीच्या प्रश्नावर मराठी अभिनेत्याची पोस्ट; "अपेक्षा खरंच मोठी आहे का ?"

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

SCROLL FOR NEXT