Hania Amir video Esakal
मनोरंजन

Hania Amir: नाटू-नाटू' वर पाकिस्तानच्या अभिनेत्रीचं नाचो नाचो! जबरदस्त डान्स व्हिडिओ व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

RRR या लोकप्रिय चित्रपटातील 'नाटू-नाटू' या गाण्याने जगभरात धुमाकूळ घातला आहे. सुपरस्टार अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या जोडिनं तर कमालचं केली आहे. या दोघांनी नाटू-नाटू जोरदार डान्स केला. या गाण्याला केवळ ऑस्कर नामांकनातच नाही तर गोल्डन ग्लोब अवॉर्ड आणि क्रिटिक्स चॉइस अवॉर्डही मिळाला आहे.

आता या गाण्याने पुर्ण देशालाच नव्हे तर जगालाही भुरळ पाडली आहे. या गाण्याने पाकिस्तानातही धुमाकूळ घातला आहे. नुकताच पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.ज्यामध्ये तो 'नाटू-नाटू' या गाण्यावर दमदार परफॉर्मन्स देताना दिसत आहे. आता त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री हानिया आमिर तिच्या सौंदर्य आणि अभिनयासाठी चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका लग्न समारंभाचा आहे, जिथे अभिनेत्री हानिया आमिरने RRR मधील 'नाटू-नाटू' ' गाण्यावर एका मुलासोबत डान्स केला.

हा व्हिडिओ अभिनेत्री सबूर अली आणि हानियासह अनेक पाकिस्तानी स्टार्सनी शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये हानियाने पांढर्‍या स्नीकर्ससह शरारा परिधान केला आहे. . तिने लग्नात पाहुण्यांसमोर डान्स करून सर्वांची मनं जिंकली.सोशल मीडियावर अनेक लोक हानियाच्या डान्स परफॉर्मन्सचे कौतुक करत आहेत.

हानियाचा चाहतावर्ग भारतही आहे. तिचा 'हमसफर' हा ड्रामा भारतातही खुप गाजला. तिला भारतिय चित्रपटांबद्दलही बरचं आकर्षण आहे. ती तिच्या इंस्टाग्रामवर अनेक पोस्ट शेअर करते. यातील बहुतांश भारतीय चित्रपटांशी संबंधित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सरकारकडून अपेक्षाच उरल्या नाहीत..., विद्यार्थ्यांना झालेली अमानुष मारहाणीवर राज ठाकरे चिडले

Student Protest: "आजच्या तरुणांना दडपणे अन् त्यांचे ब्रेनवॉश करणे, यशस्वी होणार नाही," भारतीय क्रिकेटपटूने सरकारला दाखवला आरसा

Latest Marathi News Live Update : CJP च्या शिष्टमंडळाची सरकारसोबतची बैठक संपली, नेमकी काय चर्चा झाली?

MHADA Sangli Housing : अवघ्या 15 लाखांत हक्काचं घर! 'म्हाडा'चा 354 कुटुंबीयांना निवारा, 'या' योजनेतून अनेकांची स्वप्नपूर्ती; सांगलीत घरांची बंपर लॉटरी

Ekadashi Horoscope : उद्या देवशयनी एकादशीला बनतोय दुर्मिळ योग! 'या' 5 राशीच्या लोकांची मोठी इच्छा होणार पूर्ण; धनलाभ ठरेल गेमचेंजर

SCROLL FOR NEXT