Mahira Khan Wedding Esakal
मनोरंजन

Mahira Khan Wedding: आईच्या दुसऱ्या लग्नात लेकाला अश्रू अनावर! माहिरानं शेयर केला खास व्हिडिओ

Vaishali Patil

Mahira Khan Wedding: शाहरुख खानच्या रईस चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची झलक दाखवणारी पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने काही दिवसांपूर्वी प्रियकर सलीम करीमसोबत लग्न केले. गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते.

आता त्यातच मंगळवारी माहिरा खानने स्वतः सलीमसोबतच्या लग्नाचा एक सुंदर व्हिडिओ शेयर केला. हे माहिराचं दुसरं लग्न आहे. तिने शेयर केलेल्या या व्हिडिओत सर्व लाईमलाईट लूटली ती माहिराचा मुलगा अझलानने. 14 वर्षाच्या अलझानने आपल्या आईला हात पकडून मंडपात आणले. या शाही विवाह सोहळ्यादरम्यान तो खुप भावूक झाला होता.

माहिराने तिच्या लग्नाचा एक नवीन फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्या सौंदर्याने सर्वांचं लक्ष वेधलं. तिने फिकट निळ्या रंगाचा लेहेंगा घातला होता.

माहिराचा लेहेंगा डिझायनर फराज मनानने बनवला आहे, मॅचिंग नेक पीस, कानातले आणि मांग टिक्का घालून अभिनेत्रीने तिचा वधूचा लूक पूर्ण केला.

माहिरा तिच्या मुलासह लग्नाच्या ठिकाणी पोहचली होती. माहिराने तिच्या लग्नाचा फोटोही शेअर केला असून त्याला ‘बिस्मिल्लाह’ असे कॅप्शन दिले आहे.

तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. केवळ पाकिस्तानी सेलिब्रिटी आणि चाहते नव्हे तर भारतातील कलाकारांनीही तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

5 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर माहिरा आणि सलीमने लग्न करण्याचा निर्णय घेतला. सलीमशी तिचे हे दुसरे लग्न आहे. यापुर्वी 2007 मध्ये माहिरा खानचे अली अक्सरीसोबत पहिले लग्न केले होते. या दोघांना मुलगा अझलान आहे. मात्र 2015 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. माहिरा अझलानचा सांभाळ करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT